Marathwada Sathi

मोदींची ३ कंपन्यांसोबत चर्चा…


मराठवाडासाथी न्यूज
नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लसीसंदर्भात सकारात्मक संकेत दिलेयत. पंतप्रधानांनी कोरोना वॅक्सीनवर काम करणाऱ्या तीन कंपन्यांशी व्हर्चुअली बोलणी करत आणि वॅक्सिन बनवण्यासंदर्भात महत्वाची चर्चा झाली. पुण्याची जेनोवा बायो फार्मास्युटिकल्स लिमिटेड, हैदराबादची बायलॉजिकल ई लिमिटेड आणि डॉ. रेड्डीज यांची लॅबोरेट्रीज लिमिटेड यांचा समावेश आहे.पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, या तीन कंपन्या वॅक्सिन ट्रायलच्या वेगवेगळ्या स्तरावर आहेत. यासंदर्भातील रिझल्ट येत्या वर्षाच्या सुरुवातीला येण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदींसोबत वॅक्सीन संदर्भात विविध शक्यतांवर चर्चा करण्यात आली. कायदेशीर प्रक्रिया आणि याप्रकरणी जोडलेल्या बाबी पूर्ण करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी तिन्ही कंपन्यांना केले. वॅक्सिन आणि त्याच्या प्रभावासंदर्भात सर्वसाधारण जनतेला सोप्या भाषेत समजवण्याचा प्रयत्न करा असे पंतप्रधान म्हणाले. लसिकरणासंदर्भात लॉजिस्टिक्स, ट्रान्सपोर्ट आणि कोल्ड चेन संदर्भात देखील चर्चा करण्यात आली. पंतप्रधानांनी कोरोना वायरस प्रादुर्भावातून बाहेर पडण्यासाठी वॅक्सिन बनवणाऱ्या वैज्ञानिक आणि संशोधकांच्या कामाची प्रशंसा केली.

Exit mobile version