Marathwada Sathi

मोदींचा ‘Beard Look’ ट्रेंडिंगला…!

मराठवाडा साथी न्यूज

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निवडूण आल्यानंतर ‘मोदी जॅकेट’ ची युवकांमध्ये क्रेझ वाढली होती. हि क्रेझ अजुन हि सण-उत्सवा दरम्यान बघायला मिळते.सध्या नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन पासुन आपली दाढी हि वाढवली आहे. त्यामुळे युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात नरेंद्र मोदी यांची दाढी हा आकर्षणाचा विषय ठरत आहे.युवकांमध्ये नरेंद्र मोदी यांच्या दाढी स्टाईलची क्रेज वाढत असल्याचे दिसून येत आहे. सध्या ‘मोदी दाढी’ चा ट्रेण्ड प्रत्येक हेअर सलून मध्ये आला आहे.ग्राहकांचे शॉप मध्ये जाऊन मोदी दाढी शेप करून घेण्याचे प्रमाण वाढत असून मोठ्या प्रमाणात तरुण युवकांची या स्टाईलला पसंती मिळत आहे.

Exit mobile version