Marathwada Sathi

वाढीव वीजबिलाविरोधात मनसे उतरणार रस्त्यावर

मुंबई : राज्यातील वीज ग्राहकांना वाढीव वीज बिलातून दिलासा मिळणार नाही, मीटर रिडिंगप्रमाणे आलेली बिलं ग्राहकांनी भरलीच पाहिजेत, असे राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट केले . त्यामुळे वीज बिल सवलतीबाबत राज्य सरकारने यू-टर्न घेतला आहे.यामुळे राज्यात वाढीव वीज बिलांवरून राजकारण चांगलंच तापल्याचं दिसत आहे. त्यानंतर विरोधकांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. अशातच आता मनसे देखील वाढीव वीज बिलांवरुन आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच या मुद्द्यावरून मनसे महाराष्ट्र बंदची हाक देणार असल्याचंही बोलंल जात आहे.

राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाविरोधात आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. परंतु त्याआधी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीट करुन राज्य सरकारला इशारा दिला आहे. संदीप देशपांडे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, ‘वीज बिला संदर्भात निवेदन, अर्ज, बैठका, विनवण्या सगळं झालं. पण सरकार ढिम्म आहे. जनतेला दिलासा देण्यासाठी साहेबांच्या आदेशानंतर रस्त्यावर संघर्ष करावाच लागेल कारण”लाथो के भूत बातों से नही मानते” अशा शब्दात येणाऱ्या काळात मनसे वीढीव वीज बिलाच्या माफीसाठी रस्त्यावर उतरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Exit mobile version