Home औरंगाबाद मनरेगाचा निधी कमी पडू दिला जाणार नाही – ना. संदिपान भुमरे

मनरेगाचा निधी कमी पडू दिला जाणार नाही – ना. संदिपान भुमरे

6
0

मराठवाडा साथी न्यूज
औरंगाबाद : मनरेगामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील गावामध्ये रस्ते, विहिरी, जलसंधारण, वृक्ष लागवड अशी विविध प्रकारचे 29 कामे केली जाणार असल्याची माहिती राज्याचे मंत्री संदिपान भुमरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकी नंतर माध्यमांना दिली.


मराठवाड्यातील मनरेगा कामाची आढावा बैठक राज्याचे मंत्री संदिपान भुमरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली. यामध्ये प्रामुख्याने वृक्ष लागवड बाबतीत माहिती घेण्यात आली. बहुगुणी झाडे, सागवान झाडे, फळबागा विकसित करणे यासाठी सूचना देण्यात आल्या. गावातील विहिरी अधिग्रहित करणे, नवीन विहिरी बांधणे याची देखील माहिती घेण्यात आली. प्रत्येक गावात, शेतवस्तीपर्यंत रस्ते आहेत की नाही याची माहिती घेण्यासाठी सूचना करण्यात आल्या असून येणाऱ्या काळात सर्व रस्ते तयार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. याआधी मनरेगामध्ये 2 हजार कोटी रुपयांचा निधी खर्च केला जात होता तो आता 10 हजार कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. यामाध्यमातून गावातील नागरिकांना कोणत्याही परिस्थितीत सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


संपूर्ण मराठवाड्यात चार हजार विहिरी आहेत. त्यापैकी जिल्ह्यातील 750 विहिरी या अधिग्रहित केल्या होत्या. ऐणाऱ्या काळात गावातील पाणी पातळी वाढविण्यासाठी कामे केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले, यामुळे गावातील पाणी पुरवठा समस्या निर्माण होणार नाही याकडे आतापासूनच लक्ष देण्यासाठी आदेश दिले आहेत.


कुशल तसेच अकुशल कामगारांना नियमित वेतन वाटप केले जात आहे. त्यामुळे मनुष्यबळ कमी पडणार नाही. विकास कामासाठी निधीची अडचण नसल्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणात गावाचा विकास करण्यावर भर देण्यात येणार आहे. यासाठी लवकर अंदाज पत्रके तयार करून मंजुरी घ्यावी व मंजूर झालेले विकास कामे तात्काळ पुर्ण करावे म्हणजे दुसरा निधी देण्यासाठी अडचणी येणार नाही असे त्यांनी सांगितले.

ही सर्व विकास कामे शेतकऱ्यांच्या हिताची असल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना नक्कीच होणार आहे. त्यामुळे या कामात कोणीही आडकाठी आणू नये असे मंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here