Marathwada Sathi

गिरीश बापटांच्या निधनानंतर आमदार रविंद्र धंगेकर भावुक

पुणे : भाजपचे खासदार गिरीश बापट यांचे आज रोजी निधन झाले आहे. बापट मागील बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. कसबा पेठ मतदारसंघाचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी देखील बापट यांच्या निधनावर प्रतिक्रिया दिली आहे.कसबा मतदारसंघाचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, त्यांना नगरसेवक आमदार आणि खासदार हा मोठा राजकीय प्रवास पुणे शहराला लाभला. त्यांनी काम करताना समविचारी सर्वांना सोबत घेऊन काम केलं.
पुढे बोलताना ते म्हणाले की, मागच्या आठवड्यात खासदार निधीतून कसबा गणपती मंदीरात भित्तीचित्र केलं आणि त्याच्या कार्यक्रमाला त्यांनी मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं. राजकीय स्तर कसा टिकवायचा हे गिरीश बापट साहेबांकडून शिकलं पाहिजे. त्यांच्या पाऊलावर पाऊल टाकत मी विधानसभेत काम करेल.
त्यांनी मोठं काम केलं. राजकारणात काम करताना आजची परिस्थिती आणि बापट साहेबांच्या हातात असलेला पक्ष होता तेव्हा पक्ष चुकेल तेव्हा ते सूचना द्यायचे. जे समाजात बोलायचे तेच पक्षात बोलायचे. सर्व समाज त्यांच्यासोबत होता. त्यांचं काम पुढे घेऊन जाणे हीच त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल असेही आमदार धंगेकर म्हणाले.गिरीश बापट यांचे पार्थिव दुपारी २ ते ६ पर्यंत त्यांच्या शनिवार पेठ इथल्या निवासस्थानी ठेवण्यात येणार आहेत. तर संध्याकाळी ७ वाजता त्यांच्यावर शासकीय इतमामात त्यांच्यावर वैकुंठ स्मशान भूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.

Exit mobile version