Home मनोरंजन आमदाराने बनवली ‘अंडा भुर्जी’…!

आमदाराने बनवली ‘अंडा भुर्जी’…!

69
0

मराठवाडा साथी न्यूज

नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी चक्क एका मार्केट मध्ये भूक लागली म्हणून स्वतःच्या हाताने अंडा भुर्जी बनवून खाल्ली.काल( जाने.)सकाळी वाजेच्या सुमारास रोहित यांनी नवी मुंबई एपीएमसीमधील भाजी मार्केटला भेट दिली. त्यानंतर सायंकाळी नवी मुंबईचा फेरफटका मारलात असतांना त्यांना भूक लागली आणि त्यांनी तेथील एका अंडा भुर्जीच्या गाडीवर स्वत:च्या हाताने अंडाभुर्जी बनवून तिचा आस्वाद घेतला. ट्वीट करत रोहित पवार यांनी ही माहिती दिली आहे.

रोहित पवार यांनी ट्विट मध्ये लिहिले आहे की,”नवी मुंबईत विविध ठिकाणी भेट देत असताना भूक लागल्याने एके ठिकाणी सर्वांनी अंडा भुर्जीचा आस्वाद घेतला. यावेळी अंडा भुर्जी बनवतानाचे त्या युवाचे स्कील पाहून मलाही अंडा-भुर्जी बनवण्याचा मोह आवरला नाही. शेवटी त्याच्यासारखी भुर्जी मला बनवता आली नाही पण प्रयत्न केल्याचा आनंद मात्र मिळाला.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here