Home इतर मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना आला ‘ड्रेसकोड’…!

मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना आला ‘ड्रेसकोड’…!

518
0

मराठवाडा साथी न्यूज

गबाळे कपडे चालणार नाहीत
एक दिवस खादी अत्यावश्यक
महिलांना दुपट्ट्याचे बंधन
जीन्स, टी शर्ट केला बॅन
बटबटीत-नक्षीदार कपड्यांनाही बंदी
ड्रेसने सुधारणार सरकारची प्रतिमा
स्लीपर घालण्यावर आली बंदी

मुंबई : शासकीय कर्मचाऱ्यांनाही ड्रेस कोड लागू केला आहे. सरकारी कार्यालयात कोणते आणि कसे कपडे घालावेत याबाबतचे निर्देश सरकारने शुक्रवारी (दि.११) जाहीर केले आहे.

सरकारची प्रतिमा सुधारण्यासाठी

मंत्रालयातून राज्य सरकारचा प्रशासकिय कारभार चालतो. लोकप्रतिनिधी, सर्वसामान्य नागरिक, अधिकारी हे त्यांच्या कामासाठी कार्यालयाला भेट देतात. अशा वेळी राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून सरकारी कार्यालयातील अधिकारी, कर्माचारी यांची वेशभूषा हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा महत्त्वाचा भाग आहे. तसेच कार्यालयीन वेळेत उपस्थित असताना सरकारी कर्मचारी अनुरुप ठरेल अशा वेशभूषेचा वापर करीत नाहीत. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांची जनमानसातील प्रतिमा मलिन होते.

पेहेरावाच्याही मार्गदर्शक सुचना

शासकीय कर्मचाऱ्यांकडून चांगल्या वागणुकीची तसेच व्यक्तीमत्वाची अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात येते. या परिस्थितीत जर अधिकारी, कर्मचारी यांची वेशभूषा अशोभनीय, गबाळी तसेच अस्वच्छ असेल तर त्याचा अप्रत्यक्ष परिणाम कामकाजावर देखील होतो. या सर्व गोष्टींचा विचार करता मंत्रालय तसेच सर्व राज्य शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा कार्यालयातील दैनंदिन पेहराव कशा पद्धतीने असावा, या विषयी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.

० मंत्रालयात आता जीन्स टी शर्ट नाही.
० महिलांनी साडी,सलवार चुडीदार,ट्राउझर पॅन्ट, त्यावर कुर्ता आवश्यकता असल्यास दुपट्टा बंधनकारक.
० पुरुष कर्मचाऱ्यांनी शर्ट, पॅन्ट/ ट्राऊझर असा पेहराव करावा.
० गडद रंगाचे चित्र विचित्र नक्षीकाम चित्र असलेले कपडे परिधान करू नये.
० सरकारी कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांनी स्लीपर्स वापरू नये.
० महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयामध्ये शक्यतो चपला, सॅन्डल, बूट यांचा वापरावेत.
० पुरुष अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बूट, सॅन्डल याचा वापर करावा.
० आठवड्यातील एक दिवस (शुक्रवारी) सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी खादीचे कपडे परिधान करावे.
० परिधान केलेला पेहराव स्वच्छ आणि नीटनेटका असावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here