Marathwada Sathi

MIM ची बिहारमध्ये जोरदार मुसंडी

मराठवाडा साथी न्यूज

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत आणि एनडीए १२५ जागांवर विजय मिळवण्यात यशस्वी झाली आहे. तर महाआघाडी ११० जागाच जिंकू शकली.’मोदी मॅजिक’ने तेजस्वी यादव यांचे मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न भंग केले. निवडणुकीत भाजपाने ७४ जागांवर विजय नोंदवला, तर जेडीयूला ४३ जागा मिळाल्याने आणि राजदने ७५ जागांवर विजय संपादन केले, परंतु त्यांचा मित्रपक्ष काँग्रेसला अवघ्या १९ जागा मिळाल्या.

दरम्यान, सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या RJD ला विरोधी बाकांवरच बसावे लागणार आहे. कारण भाजप, JDU आणि मित्रपक्षांच्या NDA ला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. दुसरीकडे ७० जागा लढलेल्या काँग्रेसला अवघ्या १९ जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या RJD ला काँग्रेसच्या सुमार कामगिरीमुळे सत्तेपासून दूर राहावं लागत आहे.

दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीत असदुद्दीन ओवेसी यांच्या MIM ने जोरदार प्रदर्शन करत ५ जागांवर विजय मिळवला आहे. सीमांचलमधील कोचाधामन, किशनगंज, अमोर, बहादुरजंग, बैसी, ठाकुरगंज आणि जोकीहाट या विधानसभा मतदारसंघात MIM चे उमेदवार विजयी झाले आहेत. दरम्यान ओवीसींचा MIM हा भाजपची बी टीम असल्याचा आरोप RJD आणि काँग्रेस करत राहिली आहे.

Exit mobile version