Marathwada Sathi

मेगास्टार चिरंजीवी यांना कोरोनाची लागण

दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी यांना कोरोनाची लागण झाली आहे.याअगोदर बॉलीवूड मधील अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन,कणिका कपूर आणि बऱ्याच अभिनेत्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीत मेगास्टार म्हणून ओळख असणारे चिरंजीवी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विटर च्या माध्यमातून हि माहिती आपल्या चाहत्यांना दिली आहे. हि पोस्ट बघून त्यांचे चाहते त्यांच्यासाठी प्रार्थना करीत आहेत.सोशल मीडियावर देखील #Chiranjeevi ट्रेंड करत आहे.

Exit mobile version