Marathwada Sathi

शिवसेनेकडून गुजरातींसाठी मेळावा…


मराठवाडा साथी

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेसमोर खूप मोठं आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे.शिवसेनेने आतापासूनच मुंबई महापालिका जिंकण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. शिवसेनेने यासाठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोहीम सुरु केली आहे. ‘शिवसेनेने गुजराती मतदारांना साद घातली आहे. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडी सरकार स्थापन केल्याने राज्यातील सर्वात मोठा पक्ष असूनही भाजपा सरकार स्थापन करु शकला नाही. त्यामुळे आता भाजपाने शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या मुंबई महापालिकेवर एकहाती सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. २०२२ मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाने अतुल भातखळकर यांची प्रभारी म्हणून नियुक्तीदेखील जाहीर केली आहे. तसंच सर्वच्या सर्व २२७ जागा स्वबळावर लढणार असल्याचंही जाहीर केलं आहे.त्यादृष्टीने आता शिवसेनेनेही तयारीला सुरुवात केली आहे.

शिवसेनेकडून ‘मुंबई उद्धव ठाकरे मोहीम सुरु करण्यात आली आहे. शिवसेनेकडून गुजरातींसाठी मेळावा आयोजित करण्यात आला असून त्याला ही अशी टॅगलाईन वापरण्यात आली आहे. शिवसेना संघटक हेमराज शाह यांच्यावर गुजराती मतदारांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.१० जानेवारीला जोगेश्वरीत हा मेळावा पार पडणार आहे. यासाठी मराठी आणि गुजराती भाषेत निमंत्रणं छापण्यात आली आहेत. या मेळाव्यात शिवसेनेत जाहीर प्रवेशदेखील पार पडतील असं सांगितलं जात आहे.

Exit mobile version