Marathwada Sathi

शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात दिल्लीत बैठक; राजकीय वर्तुळात चर्चा

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यामध्ये दिल्लीत बैठक सुरु आहे. मुंबईतील भेटीनंतर आता दिल्लीत या दोघांमध्ये खलबते सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. प्रशांत किशोर यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत पवार यांची भेट घेतली होती. आता दुसऱ्यांदा प्रशांत किशोर शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. या भेटीत दोघांमध्ये जवळपास तीन तास वेगवेगळ्या विषयांवर गप्पा रंगल्या. पश्चिम बंगाल निवडणूक, देशातील राजकीय परिस्थिती याबाबत या भेटीत सविस्तर चर्चा झाली असल्याची माहिती आहे. पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेसच्या विजयानंतर या भेटीला विशेष महत्व आले होते. भेटीनंतर त्यांनी एकत्र जेवण केले अशीही माहिती आहे. बिगर भाजप सरकार केंद्रातील भाजप सरकार विरोधात संघर्ष करत आहेत. राज्यात महाविकास आघाडी बनवण्याचा यशस्वी प्रयोग शरद पवार यांनी केला होता. त्यामुळे 2024 लोकसभा निवडणुकीत सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊ शकतात का, त्यांची मोट कशी बांधता येईल? शरद पवार या सर्व प्रादेशिक पक्षांना एकत्र आणू शकतात का? याबाबत या दोघांमध्ये चर्चा झाली अशी माहिती आहे.

Exit mobile version