Marathwada Sathi

महापौरांना दिली जीवे मारण्याची धमकी…!

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : चक्क महापौरांना फोन करून शिवीगाळ देत जिवंत मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना २२ डिसेंबर रोजी संध्या.६ वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने फोन करून जीवे मारण्याची धमकी किशोरी यांना दिली.या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,फोन केलेल्या व्यक्ती हिंदी भाषेतून बोलत असून त्याने अत्यंत घाण भाषेत किशोरी यांना शिव्या देऊन जीवे मारण्याची धमकी दिली होती.त्यानंतर किशोरी यांनी आझार मैदान पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तुरंत तक्रार दाखल केली होती.

दरम्यान,या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.हा फोन शेजारील राज्यातून आल्याची माहिती समोर आली आहे. लवकरच या व्यक्तीला अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

Exit mobile version