Marathwada Sathi

“मास्टर” कमाईमध्येही ठरला Master

१०० कोटींच्या वर मास्टर ने बॉक्स ऑफिसवर कमावले आहेत.

लोकेश कनागराज दिग्दर्शित ‘मास्टर’ या दाक्षिणात्य चित्रपटाने अवघ्या ७ दिवसांत तब्बल १०८ कोटी रुपयांची कमाई केली आहे. करोना काळातही एवढी कमाई करणारा हा पहिलाच भारतीय चित्रपट ठरला आहे.दाक्षिणात्य अभिनेता विजयची प्रमुख भूमिका असलेला ‘मास्टर’ हा चित्रपट १३ जानेवारीला तर हिंदी भाषेतील डब चित्रपट १४ जानेवारीला देशभर प्रदर्शित झाला.

या चित्रपटाने पहिल्या दिवशी २५ कोटी तर दुसऱ्या दिवशी ५४ कोटी रुपयांचा व्यवसाय केला असल्याची माहिती सिने वितरक अंकित चंदीरामानी यांनी दिली. मनोरंजन क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या ‘बुक माय शो’ या संकेतस्थळावरही ‘मास्टर’ या चित्रपटाच्या एक कोटी तिकिटांची विक्री झाल्याचे ‘बुक माय शो’चे प्रमुख आशीष सक्सेना यांनी सांगितले. करोनामुळे असलेल्या निर्बंधानंतरही या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. प्रदर्शनापूर्वीच ‘मास्टर’ला ८० टक्के अधिक प्रेक्षकांनी पूर्वनोंदणी केली.या चित्रपटाला चेन्नई बरोबरच बंगलोर, कोईंबतूर, मदुराई, त्रिची, हैदराबाद, सालेम, त्रिवेंद्रम, कोची, तिरूपूर आणि मुंबई या शहरांतही चांगला प्रेक्षकवर्ग लाभल्याचे सक्सेना यांनी स्पष्ट केले. ‘मास्टर’ चित्रपटाच्या यशामुळे निर्माते तसेच चित्रपटगृह मालकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे करोना काळात ठप्प झालेल्या मनोरंजन सृष्टीला पुढे उभारी मिळेल, असे मत ‘पीव्हीआर सिनेमाज’चे कमल गियाचंदानी यांनी व्यक्त केले.

Exit mobile version