Marathwada Sathi

शहीद अमित पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार…!

मराठवाडा साथी न्यूज

जळगाव : ‘वीर जवान अमित पाटील अमर रहे’ च्या जयघोषात सीमा सुरक्षा दलाच्या १८३ बटालियन मध्ये कार्यरत असलेले जवान अमित पाटील यांच्या पार्थिवावर आज दुपारी १२:३० च्या सुमारास त्यांच्या मूळगावी वाकडी, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

बुधवार (१६ डिसें.)रोजी जम्मूमधील पूंछ भागात अमित यांना वीरगती प्राप्त झाली. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण, चाळीसगावचे उपविभागीय अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, उपविभागीय पोलिस अधिकारी ईश्वर कातकडे, तहसीलदार अमोल मोरे, गटविकास अधिकारी वाय. एन. वाळेकर, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे प्रतिनिधी श्री वाकडे यांच्यासह पाटील कुटुंबीय व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.दरम्यान, अनेक मान्यवर व्यक्ती, संस्थाच्यावतीने वीर जवान अमित यांना श्रध्दांजली अर्पण केली.

Exit mobile version