परळी -दै.मराठवाडा साथी व परळी टाईम्स सोशल मिडीया ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात कार्य करणार्या व समाज रचनेत नेहमीच पुढाकार घेणार्या परळीतील कर्मयोगींचा सन्मान सोहळा आज दि. 26 जानेवारी रोजी सायं.4 वा. मान्यवरांच्या उपस्थितीत लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिर येथे होत आहे. फेस ऑफ परळी असे या सन्मान सोहळ्याचे स्वरुप राहणार आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून परळीतील काम करणार्या सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींचे मूल्यांकन करुन त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. कार्यक्रमास अॅड. अजित देशमुख व सामाजिक क्षेत्रात काम करणारे दत्ता बारगजे व सौ.संध्या बारगजे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
दै.मराठवाडा साथीच्या 41 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून परळी टाईम्सच्या सोशल मिडीयाद्वारे परळी शहरात कोरोना कालावधीत तसेच इतर निमित्ताने सामाजिक क्षेत्रात आगळे-वेगळे परंतु लक्षवेधी काम करणार्या कर्मयोगींचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सायं.4 वा. होत असलेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन समितीचे विश्वस्त अॅड. अजित देशमुख, इन्फंट इंडियाचे संस्थापक दत्ता बारगजे, आनंद ग्राम पालीच्या संचालिका सौ.संध्या बारगजे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. याचसोबत परळी न.प.तील रा.कॉ. गटनेते वाल्मिकअण्णा कराड, नायब तहसिलदार बी.एल.रुपनर, ज्येष्ठ फिजीशिएन डॉ. आर.बी.जाजू, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक बाजीराव धर्माधिकारी, प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत. मराठवाडा साथीचे मुख्य संपादक चंदुलाल बियाणी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होत असून सामाजिक क्षेत्रातील कर्मयोगींना प्रोत्साहन देण्यासाठी नागरिकांनीही या कार्यक्रमास आवर्जुन उपस्थित रहावे, असे आवाहन मराठवाडा साथी व परळी टाईम्स ग्रुपने केले आहे.