Home मराठवाडा मराठा क्रांती मोर्चा मशाल मार्च मातोश्रीवर धडकणार

मराठा क्रांती मोर्चा मशाल मार्च मातोश्रीवर धडकणार

मराठा आरक्षण लागू व्हावं, सुप्रिम केर्टात ते टिकावं, यासाठी मराठा क्रांती मोर्चाने आज मशाल मार्चचं आयोजन केलं आहे.

524
0

राजधानीत पोलीस यंत्रणा सतर्क, जादा फौजफाटा तैनात

मुंबई:  राज्यातील सकल मराठा समाजाचा मराठा क्रांती मोर्चा मशाल मार्च आज सायंकाळी मातोश्रीवर धडकरणार आहे. मराठा आरक्षण लागू व्हावं, सुप्रिम केर्टात ते टिकावं, यामागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाने आज मशाल मार्चचं आयोजन केलं आहे. मात्र, मराठा क्रांती मोर्चा अजूनपर्यंत सर्व नियम पाळून, शांततेत झाला आहे. त्याप्रमाणेच आजचा मशाल मार्चही शांततेत काढण्यात येईल. मोर्चेकरी हे बांद्रा कलेक्टर कार्यालयाच्या समोरे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानात जमा होत आहेत. मोर्चासाठी पूर्व तयारी म्हणून बैरिकेट्स आदिची व्यवस्था करण्यात आली आहे

मराठा क्रांती मोर्चा माशाल मार्च च्या सुरक्षा व्यवस्थेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून पोलिस यंत्रणा सतर्क असून राज्याच्या राजधानीत पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मोर्चेकऱ्यांच्या वाहनांसाठी वांद्रे, खेरवाडी येथे पीडब्ल्यूडी ग्राऊंडमध्ये वाहने पार्किंगची सोय करण्यात आली आहे. मोर्चेकर्त्यांच्या वतीने मातोश्रीवर माननीय मुख्यमंत्र्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे.

मुंबईच्या कलानगर इथे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी हा मशाल मार्च पोहोचणार आहे. त्यामुळे मातोश्रीवरील पोलीस सकाळपासूनच सतर्क झाले आहेत. मातोश्रीच्या गेट नंबर-2, मागच्या गेटजवळ पोलिसांनी बॅरिकेटिंग केली आहे. राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या इथे तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच, वरिष्ट पोलिसांकडूनही गस्त घालण्याचं काम सातत्याने सुरु आहे.

अनेक मराठा नेत्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिल्याने त्यांनाही मुंबई पोलिसांनी 144 च्या नोटीस पाठवल्या आहेत. वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आंबेडकर चौकात 250 राज्य राखीव पोलीसांची तैनाती काल रात्रीपासूनच करण्यात आली आहे. तिथे सात गाड्या आणि 250 पोलीस चौकात दाखल झाले आहेत.

मराठा क्रांती मशाल मोर्चाची नियमावली

  • प्रतिकात्मक मशाली
  • कायदा सुव्यवस्थेचा आदर करता,  खऱ्या मशाली राहणार नाहीत .
  •  वाहने नेमून दिलेल्या वाहनतळावर पार्क करून शांततेच्या मार्गाने दिलेल्या नियोजित ठिकाणी मशाल मार्चसाठी मोर्चेकरी जाम होणार आहेत.

मार्चमध्ये केवळ याच घोषणा दिल्या जाणार आहेत. जय भवानी जय शिवराय,एक मराठा लाख मराठा, तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय,आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here