Home अर्थकारण दिल्लीत जाणार मराठा समाज…

दिल्लीत जाणार मराठा समाज…

240
0


मराठवाडा साथी न्यूज
औरंगाबाद :
मराठा समाजाला केंद्रीय स्तरावर आरक्षण मिळावे, आरक्षणाची मर्यादा वाढवावी यासाठी मराठा क्रांतीमोर्चा केंद्र शासनाच्या विरोधात अधिवेशन काळात दिल्लीत धडकणार आहे. बुधवारी (३० डिसेंबर) मराठा क्रांतीमोर्चाचे समन्वयक किशोर चव्हाण, तसेच राजेंद्र दाते पाटील यांनी दिली. दिल्ली येथे काढण्यात येणाऱ्या मोर्चासंदर्भातील नियोजन सुरू आहे . मराठा आरक्षणाची स्थगिती उठवण्यासाठी शासनाने भक्कम पावले उचलून याबाबतचे नियोजन करून मराठा समाजाचे ‘एसईबीसी’ आरक्षण टिकवावे राज्य शासनाने मराठा विद्यार्थ्यांना ‘ईडब्लूएस’ २० टक्के आरक्षणाचा विषय न्यायालयील निर्देशाप्रमाणे ऐच्छिक ठेवावा, अशी मागणीही यावेळी पत्रकार परिषदेत करण्यात आली. १०२ वी घटनादुरुस्ती मराठा आरक्षणाला अडसर आहे काय, हा प्रश्नही आता निकाली निघाला असून केंद्रीय मागसवर्ग आयोगाने १०२ व्या घटना दुरुस्तीमुळे राज्याच्या इतर मागासवर्गीयांसाठी आरक्षण देण्याच्या अधिकाराला कोणत्याही प्रकारचा धक्का लागत नाही.
आज कोणत्याही जातीला स्वत:च्या अधिकारात आरक्षण देऊ शकते. कोणतेही आरक्षण देताना केंद्र सरकारची परवानगी घेण्याची गरज नाही, असे नमूद आहे. त्यामुळे गरज नसताना घातलेल्या घोळाला पूर्णविराम लावून राज्य सरकारने तत्काळ केंद्रीय मागासवर्गीय आयोगाकडे शिफारशीसह पत्र विशेष दुताकडे पाठवून तसेच स्पष्टीकरण घ्यावे व सर्वोच्च न्यायालयात ते सादर करावे, अशी मागणी अभ्यासक आणि सर्वोच्च न्यायायातील मुख्य हस्तक्षेप याचीकाकर्ते राजेंद्र दाते पाटील यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here