Marathwada Sathi

चक्क CM सह अनेक मंंत्र्यांनी बुडवली पाणीपट्टी…!

मराठवाडा साथी न्यूज

तब्बल २४ लाख ५६ हजार ४६९ रूपयांची पाणीपट्टी थकली

मुंबई : विधिमंडळाचे अधिवेशन सुरू झाले अन पहिल्याद दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अन्य काही मंत्र्यांना मुंबई महापालिकेने डिफॉल्टर घोषित केले. तब्बल २४ लाख ५६ हजार ४६९ रुपयांची पाणीपट्टी थकवल्याने महापालिकेने ही कारवाई केली.

माहितीच्या अधिकारातुन झाले डिफॉॅल्टर

‘माहिती अधिकार’ कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई महापालिकेच्या संकेतस्थळवरून पाण्याच्या थकबाकीदारांची माहिती मिळविली. त्यानुसार, मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांच्या बंगल्यांची पाणी पट्टी थकल्याचे महापालिकेला कबुल करावे लागले. CM च्या ‘वर्षा’ बंगल्यासह इतर मंत्र्यांच्या सरकारी निवासस्थानाकडे पाण्याची एकूण २४ लाख ५६ हजार ४६९ थकबाकी आहे.

या मंत्र्यांचाही आहे समावेश

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासोबतच मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांचा (तोरणा), उपमुख्यमंत्री अजित पवार (देवगिरी), जलसंपदामंत्री जयंत पाटील (सेवासदन), ऊर्जामंत्री नितीन राऊत (पर्णकुटी), महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (रॉयलस्टोन), विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (सागर), अशोक चव्हाण (मेघदूत) सुभाष देसाई, उद्योगमंत्री (पुरातन), दिलीप वळसे-पाटील (शिवगिरी), सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे (नंदनवन), राजेश टोपे (जेतवन), विधानसभा अध्यक्ष नाना पटोले (चित्रकूट), राजेंद्र शिंगणे (सातपुडा), नवाब मलिक (मुक्तागिरी), छगन भुजबळ (रामटेक), विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर (अजिंठा) आणि सह्याद्री अतिथीगृहाचा समावेश आहे.

पाणी बिल थकबाकी

‘शासकीय विभाग पाण्याची थकबाकी वेळेवर भरत नसेल तर सर्वसामान्य जनतेने का भरावी? महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल मंत्र्यांच्या निवासस्थानांचे पाणी रोखण्याची हिंमत करणार का?,’ असा प्रश्न शकील अहमद शेख यांनी केला.

Exit mobile version