Home मनोरंजन मामी च गाणं सापडल;रिलीज नका करू…!

मामी च गाणं सापडल;रिलीज नका करू…!

725
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना अनेकदा ट्रोल केलं गेलं आहे. त्यांचे गाणे ‘तिला जगू द्या’ या गाण्यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या. या गाण्याला त्यांना बऱ्याच टीकेचाही सामना करावा लागला होता. या गाण्यावर अक्षरशः डिसलाईक्सचा वर्षाव करण्यात आला होता. या गाण्याचा आशय चांगला असला तरी राजकीय विरोधाने ट्रोल केलं जातं असं देखील त्या म्हणाल्या. आता, १७ डिसेंबर त्यांचं नवं गाणं प्रदर्शित होणार आहे.हे गाणे येण्याआधीच आता नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. अमृता यांचे नवे गाणे येत्या गुरुवारी येणार असून हे गाणे प्रेक्षकांना आयकण्यासाठी रिलीज केले जाऊ नये अशी मागणी करणारी ऑनलाइन याचिकाच चेंज डॉट ओआरजी या वेबसाईटवर तयार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या ऑनलाइन याचिकेचे काही तासांमध्ये ४०० हून अधिक जणांनी समर्थन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here