Home क्रीडा माहोल IPL चा पण चर्चा अनुष्काच्या

माहोल IPL चा पण चर्चा अनुष्काच्या

549
0

मुंबई : सोशल मीडियावर अनुष्का शर्माचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. आताही तिचे पांढऱ्या ड्रेसमधले अनेक फोटो समोर आले आहेत. यात अनुष्का फारच सुंदर दिसत आहे. अनुष्काचे हे फोटो कोणत्याही फोटोशूटचे नसून अबु धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्या दरम्यानचे आहेत.

अनुष्का शर्माचे अनेक हावभाव यावेळी कॅमेर्‍यात कैद झाले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला प्रोत्साहन देण्यासाठी आणि संघाला पाठिंबा देण्यासाठी अनुष्का स्टेडियमवर पोहोचली होती. सध्या अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीच्या वेगवेगळ्या फॅन पेजवरून स्टेडियमवरचे अनुष्काचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

या सर्व फोटोंमध्ये अनुष्काचा साधेपणा चाहत्यांना आवडत आहे. यावेळीच नाही तर याआधीही ती पती विराट कोहली आणि त्याच्या टीमला प्रोत्साहन देण्यासाठी स्टेडियमवर गेली आहे. या फोटोंमध्ये अनुष्काचा बेबी बंप स्पष्ट दिसत आहे. पांढऱ्या ड्रेस प्रमाणेच तिचे लाल रंगाच्या ड्रेसमधलेही अनेक फोटो इन्स्टाग्रामवर व्हायरल झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here