Marathwada Sathi

महाराष्ट्राचे “मिनी काश्मीर ” गोठले

मराठवाडा साथी

महाबळेश्वर : महाराष्ट्रातील मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरचा पारा ९ अंशाच्या खाली घसरला आहे. त्यामुळे येथील “वेण्णा तलाव “गोठला आहे. या ठिकाणी ५ . ५ अंश सेल्सियस ची नोंद झाली आहे.

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात थंडीची लाट ओसरत आहे. त्यात महाबळेश्वरमधील वातावरण पर्यटकांना आकर्षित करीत आहे. जसजसा येथील पारा घसरत जात आहे तसे येथील दंवबिंदूही गोठत आहेत. त्यामुळे याठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढत आहे. एकंदरीत पर्यटकांना येथे काश्मीरसारखा फील येत आहे.

Exit mobile version