Home आरोग्य MaharashtraCoronaUpdate : भयंकर ! राज्यात 249 कोरोना बळींची नोंद; दिवसभरात 43 हजार...

MaharashtraCoronaUpdate : भयंकर ! राज्यात 249 कोरोना बळींची नोंद; दिवसभरात 43 हजार 183 नवे रुग्ण

3998
0

मुंबई । राज्यात दररोज नव्या कोरोना बाधित रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत असून आज पुन्हा एकदा नव्या कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ४३ हजार १८३ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. काल ही संख्या ३९, हजार ५४४ इतकी होती. कालच्या तुलनेत ही वाढ ३ हजार ६३९ ने अधिक असून अधिक चिंतेची बाब म्हणजे आज राज्यात एकूण २४९ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ही संख्या २२७ इतकी होती.

सध्या राज्यातील मृत्यूदर १.९२ टक्के इतका आहे. राज्यात आज ३२ हजार ६४१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण २४ लाख ३३ हजार ३६८ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.०२ टक्क्यांवर आले आहे. तर राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ३ लाख ६६ हजार ५३३ वर जाऊन पोहचली आहे.

पुण्यातील स्थिती चिंताजनक

दरम्यान पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ६४ हजार ५९९ इतके रुग्ण आहेत तर नागपूर जिल्ह्यात ही संख्या ४८ हजार ८०६ इतकी झाली आहे. मुंबई पालिका हद्दीत हा आकडा ५४ हजार ८०७ इतका आहे. तर ठाणे जिल्ह्यात सध्या ४२ हजार १५१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर रायगडमध्ये एकूण ४ हजार ६७० इतके सक्रिय रुग्ण आहेत.

या बरोबरच नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ३६ हजार २९२ इतकी आहे. अमरावतीत ही संख्या २ हजार ९८३, औरंगाबादमध्ये १३ हजार ४८२, जळगावमध्ये ६ हजार ९६९, अहमदनगरमध्ये ९ हजार ८५७ इतकी आहे. तर, कोल्हापुरात सक्रिय रुग्णांची संख्या ७५८ इतकी आहे. तसेच नांदेडमध्ये ही संख्या १० हजार ००६ इतकी आहे. राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या पुण्यात आहे. तर, सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या गडचिरोली जिल्ह्यात आहे. येथे सक्रिय रुग्णांची संख्या ४३१ इतकी आहे.

१९,०९,४९८ व्यक्ती होम क्वारंटाईन

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ९९ लाख ७५ हजार ३४१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २८ लाख ५६ हजार १६३ (१४.३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १९ लाख ०९ हजार ४९८ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, १८ हजार ४३२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here