Home आरोग्य Maharashtra News Update : लॉकडाऊन बाबत मुख्यमंत्र्यांची बैठक सुरु

Maharashtra News Update : लॉकडाऊन बाबत मुख्यमंत्र्यांची बैठक सुरु

9267
0

मुंबई : राज्यातील कोरोना संसर्गाच्या उद्रेकावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक  बोलावली आहे. महाराष्ट्राच्या लॉकडाऊनसंबंधात  या बैठकीत निर्णय अपेक्षित आहे. ऑनलाईन होणाऱ्या या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस , मनसे अध्यक्ष राज ठाकरे , भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांची उपस्थिती आहे. संध्याकाळी 5 वा. या बैठकीला सुरुवात झाली.

दरम्यान राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी यापूर्वीच तीन आठवड्यांच्या कडक लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीत नेमका कोणता निर्णय होतो  याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. यावेळी राज्यात संपूर्ण लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याबाबत गांभीर्यानं विचार केला जाणार असल्याची चर्चा आहे.

अजित पवार यांची प्रतिक्रिया 

राज्यात पुन्हा एकदा करोनाचे रुग्ण वेगाने वाढू लागले आहेत. करोनाचा संसर्ग वाढल्यामुळे प्रशासनाची देखील चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन लागू न करता काही प्रमाणात निर्बंध घालण्यात आले आहेत. याविषयी बोलताना आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातल्या जनतेला आवाहन केलं आहे. “मलाही कळतंय की गेल्या अनेक महिन्यांपासून सगळ्यांनाच करोनामुळे त्रास होतोय. त्यामुळे काहींच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे. पण कोरोनाची साखळी तोडणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. सगळ्यांनीच एकमेकांना कोणत्याही प्रकारचं राजकारण न आणता सहकार्य करायला हवं. केंद्र आणि राज्य सरकारने एकमेकांवर टोलवाटोलवी न करता काम करायला हवं”, असं अजित पवार म्हणाले आहेत. पुण्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here