Marathwada Sathi

‘मॅम बदल्यांसाठी तरी लक्ष द्या हो’

तिन्ही पोलिस स्टेशनमध्ये बदल्यांसाठी ‘हरे पत्तीयोंका जादू’
मोबीन खान । वैजापुर
‘होम टाउन’मध्ये राहून आपला दबदबा निर्माण करत अवैध व्यावसायिकांशी आपले ‘सूत’ जुळवून घेऊन वर्षानुवर्षे ‘तग’ दबा धरून बसलेल्या वैजापुरातच नोकरी करणाऱ्या पोलिसांच्या यंदातरी बदल्या होणार का? या तिन्ही पोलिस स्टेशनमध्येही बदल्यांसाठी ‘हरे पत्तीयों का जादू चलने वाला है क्या?’ असा फॉर्म्युला चालणार असल्याची चर्चा आहे.
ती यंत्रणा मोडा तरी : पोलिस अधिकाऱ्यांची दोन-तीन वर्षांनी, तर कर्मचाऱ्यांची सहा वर्षांनी दुसरीकडे बदलीचा नियम आहे. एक कर्मचारी एका डिव्हीजनमध्ये १० ते १२ वर्षे राहू शकतो. त्यानंतर त्या कर्मचाऱ्याची दुसऱ्या डिव्हीजनमध्ये बदली केली जाते. कारण अधिकारी किंवा कर्मचारी यांचे एखाद्याबरोबर निर्माण झालेला वाद, पूर्वग्रहदूषितपणा यामुळे संबंधिताला त्रास होऊ शकतो. तसेच लागलेली अन्य स्वरूपाची ‘यंत्रणा’ मोडीत निघावी, हा उद्देश आहे. मात्र, तो उद्देश वैजापूर तालुक्यात सफल होताना दिसत नाही. काही पोलिस कर्मचारी वर्षानुवर्षे याच तालुक्यातील विविध ठाण्यांत बदली करून घेतात

बदलीनंतरही ‘जुनी यंत्रणा’ राहाते सुरूच : हद्द बदलली तरी जुन्या हद्दीतील ‘यंत्रणा’ कार्यान्वित ठेवली जाते. त्यानंतर बदली झालेल्या ठाण्यांतही यंत्रणेत सहभागी होता येते, असा दुहेरी फायदा ते करून घेतात. काही मर्जीतील पोलिस कर्मचारी बदली झाली तरी त्याच पोलिस ठाण्यात काम करत राहतात. बदली झालेल्या ठिकाणी हजर होत नाहीत, त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत वशिलाही लावतात. तसेच काही कर्मचारी वशिलेबाजीने वैजापुर,शिऊर अणि विरगाव ठाण्यात वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेले आहेत. अशा कर्मचाऱ्यांचे उपद्व्याप व उठाठेव पाहिली, तर सर्वसामान्यांना धसका बसेल, अशी आहे.

प्रामाणिक कर्मचाऱ्यांवर होतो अन्याय
पोलिस खात्यातील अशा काही कर्मचाऱ्यांमुळे अनेकवेळा खाकी वर्दीवर डाग पडतात. अशा प्रकारांमुळे प्रामाणिकपणे काम करणाºया पोलिसांवर मात्र अन्याय होतो. त्यांचे खच्चीकरण होऊन त्याचा कामावरही विपरित परिणाम होतो. त्यामुळे या प्रकाराकडे वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी गांभीर्याने लक्ष देऊन अतातरी अशा कर्मचाºयांची उचलबांगडी करावी, अशी मागणी होत आहे.

मामू को हरी पत्ती दिखा रे!
‘होम टाउन’ मध्ये नोकरी करणाऱ्या तालुक्यातील विरगाव पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी गोदापात्रावर चांगलेच ‘दिप’ लावण्याचे काम सुरु केले आहे.त्यामुळे येथील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे बिघडलेली आहे. येथील पोलिसांचे ‘लक्ष्य’ केवळ सावज टिपणे आणि साहेबांसाठी ‘वसुली’ करणे यावर अधिक भर आहे. ट्रॅक्टर मध्ये अवैध वाळू वाहतूक केल्यानंतर विरगाव पोलिस पकडतात. त्यावर ‘मामू को हरी पत्ती दिखा रे.. अशी प्रतिक्रिया देत लगेच किती रूपये देऊ अशी विचारणा केली जाते. विशेष म्हणजे थेट बोलल्यास पोलिसही ‘हिचकिच’ न करता थेट ‘हरी पत्ती’ ठेवून घेतो. त्यामुळे ‘हरी पत्ती’ अशी ओळख पोलिसांची झाल्याची चर्चा आहे.

Exit mobile version