Home इतर एलपीजी सिलिंडरची साठवणूक पडू शकते महागात…!

एलपीजी सिलिंडरची साठवणूक पडू शकते महागात…!

463
0

मराठवाडा साथी न्यूज

पालघर : तारापूर औद्योगिक वसाहती मध्ये असलेल्या एका मोकळ्या जागेत एका गॅस वितरकाने जुन्या व मोकळ्या आलेल्या वाहनांचा वापर एलपीजी इतर सिलिंडरच्या साठवला. उघडय़ावर अशा सिलिंडरची साठवणूक होत असल्याने कोणत्याही क्षणी दुर्घटना होऊ शकते.एलपीजी व प्राणवायूचे विविध क्षमतेचे सिलिंडर यांचा समावेश आहे. हे सर्व सिलिंडर उघडय़ावर साठवले जात असल्याचे दिसून येत.

औद्योगिक वसाहत परिसरात आहे .फेब्रिकेशन वर्कशॉपमध्ये या सिलिंडर वितरण करण्यात येत असून बाहेर गावाहून नवीन साठा या ठिकाणी ठेवल्या जातो . विशेष म्हणजे गॅस सिलिंडर बंद गोडावूनमध्ये साठवणूक करणे आवश्यक असताना असे शेकडो सिलिंडर उघडय़ावर साठवणूक होत असताना प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या ठिकाणाजवळ पेट्रोलपंप, हॉटेल, रुग्णालय तसेच रहिवासी संकुल असून या ठिकाणी दुर्घटना घडल्यास त्याची झळ परिसराला पोहोचू शकते, अशी भीती येथील ग्रामस्थांनी वाटत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here