Home क्राइम प्रेमानेच केला प्रेमाचा अंत

प्रेमानेच केला प्रेमाचा अंत

130
0

मुंबई : शेवटची भेट घेण्यासाठी प्रेयसीला बोलाविले आणि तिथेच प्रेयसीवर गोळी झाडून त्याने स्वतःचेही जीवन संपविले. हि भयानक घटना मुंबईच्या मालाड परिसरात घडली आहे. २२ वर्षीय निधी मिश्रा हि मालाड परिसरात राहत होती . तर तिचा प्रियकर राहुल यादव हा कांदिवली परिसरात राहत होता. दोघेही एका खाजगी कंपनीत कामाला होते. तिथेच त्यांना एकमेकांवर प्रेम जडले. पण दोघेही वेगळ्या जातीचे असल्याने घरच्यांकडून त्यांच्या विवाहाला विरोध होत होता. निधीच्या घरी याबाबत कळल्याने घरच्यांनी तिचे दुसरीकडे स्थळ पाहण्यास सुरुवात केली. एवढेच नाही तर निधीचा साखरपुडाही करण्यात आला होता. हि माहिती राहुलला कळल्यानंतर त्याने तिला भेटायला बोलाविले. मालाड येथील इनॉरबीटजवळ रात्री हे दोघे भेटले.

यावेळी त्यांनी बराच वेळ संभाषण केले. मात्र घरच्यांचा विरोध पाहता त्यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला. राहुल हा त्याच्यासोबत गावठी कट्टा घेऊनच आला होता. याच गावठी कट्ट्याने त्याने अगोदर निधीवर गोळी झाडली.नंतर स्वतःवरही गोळी झाडून त्याने आत्महत्या केली. रात्री साडे नऊ वाजता मालाड येथे हि घटना घडली. प्रत्यक्षदर्शींनी पाहता क्षणी याना रुग्णालयात नेले असता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान राहुलकडे गावठी कट्टा आला कुठून याचा पोलीस शोध घेत आहेत. तसेच दोघांचीही ओळख पटली असून पोलिसांकडून दोघांच्याही घरच्यांची विचारपूस केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here