Marathwada Sathi

दिल्लीमध्ये पुन्हा होणार लॉकडाउन : केजरीवाल

मराठवाडा साथी न्यूज

नवी दिल्ली : दिल्लीत कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. तेथील परिसरात पुन्हा एकदा स्थानिक पातळीवर छोट्या प्रमाणात लॉकडाउन करण्याचा प्रस्ताव दिल्ली सरकारने केंद्राकडे पाठवला आहे. मोठ्या बाजारपेठा आणि अन्य गर्दीच्या ठिकाणी हॉटस्पॉटमध्ये पुन्हा एकदा कडक लॉकडाउन लावण्याचा विचार करण्यात येणार आहे. कोरोनाविरोधातील लढ्यात दिल्ली सरकारसोबत केंद्र सरकारही उतरले असून लवकरचं लॉकडाउनबाबत निर्णय घेतला जाईल.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी सांगितले की आम्ही लग्नाच्या कार्यक्रमात २०० लोकांना जाण्याची परवानगी दिली होती. परंतु वाढत्या संकटामुळे ५० लोक लग्न सोहळ्याला उपस्थित राहू शकतात. दिल्लीत कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतचं चालली आहे. एकूण ४ लाख ८९ हजार २०२ पैकी ४० हजार १२८ सक्रिय कोरोनाचे रुग्ण राजधानीत आहेत.

नियमांचे पालन केले जात नसल्याने सरकारने कठोर भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीतील कोरोना परिस्थितीत पुन्हा हस्तक्षेप केला आहे.गेल्या काही तासांमध्ये दिल्लीत १०० पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नोव्हेंम्बर मध्ये ११०० हुन अधिक लोकांनी आपले प्राण गमावले आहे. आतापर्यंत भारतातील कोरोनाचा एकूण ८८ लाख ७४ हजारांहुन अधिक लोकांना संसर्ग झाला आहे. आतापर्यंत देशात १.३ लाखाहून अधिक लोक मरण पावले आहेत. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, केरळ या राज्यांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक नवीन रुग्ण आढळुन येत आहेत.

Exit mobile version