Home औरंगाबाद औरंगाबादेत सोमवारपासून लाँकडाऊन ?

औरंगाबादेत सोमवारपासून लाँकडाऊन ?

2600
0

औरंगाबाद : शहरात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. मागील काही दिवसांपासून दररोज तिनशेपेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे प्रशासनाने शहरात दहा दिवसाचा लाँकडाऊन लावण्याची तयारी सुरू केली असून सोमवारपासून अंमलबजावणी होण्याची दाट शक्यता वरिष्ठ सुत्रांनी व्यक्त केली.

शहरात कोरोना संसर्गाचा फैलाव झपाट्याने वाढला आहे. आतापर्यत १५ दिवसात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा तीन हजारापेक्षा अधिक झाला आहे. मार्चच्या पहिल्या तारखेला बाधित रुग्ण २९९ होते. २ रोजी ३०७, ३ रोजी ३३९, ४ रोजी ३५१, ५ रोजी ३५३ या प्रमाणे बाधितांचा आकडा वाढतच चालला आहे. कोविड केअर सेंटरसह खासगी रुग्णालये रुग्णांनी भरले आहे. त्यामुळे रुग्णांसाठी बेडची कमतरता भासत आहे. दिवसेंदिवस पाँझिटिव्हीटी रेट वाढत जात असल्यामूळे प्रशासनाने लाँकडाऊन लावण्याची तयारी सुरू केली असून सोमवारपासून सात दिवसाकरिता लाँकडाऊन होण्याची दाट शक्यता सुत्रांनी व्यक्त केली आहे.

जिल्ह्यात लॉकडाऊन बद्दल अद्याप निर्णय नाही – जिल्हाधिकारी

सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा करून परिस्थिती नुसार निर्णय घेऊ, निर्बंध वाढवण्यात येतील. सर्व गोष्टीवर प्रशासनाचे बारीक लक्ष आहे. नागरिकांनी नियम पाळावे असे आवाहन प्र. जिल्हाधिकारी डॉ. गव्हाणे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here