Marathwada Sathi

आजपासून ‘लोकल’ धावणार…!

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर आजपासून (१७ डिसें.)एसी लोकल धावणार आहे.‘कल्याण ते सीएसएमटी’ नव्या फेऱ्यांची समावेश न करता वेळापत्रकातील साध्या लोकलच्या फेऱ्यांऐवजी एसी लोकलच्या १० फेऱ्या चालविण्यात येणार असून प्रत्येक स्थानकावर ही एसी लोकल थांबणार आहे.सध्या लॉकडाऊनमुळे ट्रान्सहार्बरवरील एसी लोकल बंद आहे.तीही लवकरच सुरू करण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर २५ डिसेंबर २०१७ पासून वातानुकूलित लोकल धावत आहे. एसी लोकलचे भाडेदर फर्स्ट क्लासच्या दरापेक्षा १.३ पट जास्त असल्याने मध्य रेल्वेच्या एसी लोकलला कसा प्रतिसाद मिळतो ते पाहून तिच्या फेऱ्या वाढविण्याचा विचार केला जाणार आहे.

Exit mobile version