Home परभणी महाराष्ट्र सुन्न! पेणमध्ये ३ वर्षांच्या आदिवासी मुलीवर बलात्कार करून हत्या

महाराष्ट्र सुन्न! पेणमध्ये ३ वर्षांच्या आदिवासी मुलीवर बलात्कार करून हत्या

244
0

पेण: महाराष्ट्राला सुन्न करणारी घटना रायगडमधील पेणमध्ये घडली आहे. एका ३ वर्षीय आदिवासी मुलीवर बलात्कारकेल्यानंतर तिची हत्या करण्यात आली. आरोपी हा पॅरोलवर सुटला होता. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात असून, पेणपोलीस ठाणे आणि सरकारी रुग्णालयाबाहेर समाजातील नागरिकांनी गर्दी केली आहे.
पेणमधील वडगाव परिसरात काल रात्री ही धक्कादायक घटना घडली. पॅरोलवर अलिबाग तुरुंगातून बाहेर आलेल्या आरोपीने ३ वर्षीय आदिवासी मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर तिची हत्या केली. तिथेच तिचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पेणच्या ग्रामीण रुग्णालयात तिचा मृतदेह विच्छेदनासाठी आणण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीत तिच्यावर बलात्कार करून हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
आरोपी हा गागोदे येथील राहणार असून, गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. याआधीही बलात्काराच्या आरोपाखाली तो तुरुंगात गेला होता. तो अलिबाग तुरुंगात शिक्षा भोगत आहे. अलीकडेच तो जामिनावर सुटून बाहेर आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली असून, सर्वसामान्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. पेण ग्रामीण रुग्णालय आणि पेण पोलीस ठाण्यात आदिवासी समाजातील नागरिकांनी गर्दी केली आहे. या घटनेने संताप व्यक्त केला जात असून, खबरदारी म्हणून पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here