Home बीड दोन दिवसांत वाळू माफियांची यादी करून रिपोर्ट करा नसता कार्यवाही

दोन दिवसांत वाळू माफियांची यादी करून रिपोर्ट करा नसता कार्यवाही

गेवराईत महसूल कर्मचाऱ्यांच्या बैठकीत जिल्हाधिकारी रेखावार यांनी दिल्या सक्त सूचना 

42
0

गेवराई : तालुक्यातील बोरगाव याठिकाणी महसुल पथकावर वाळू माफियांनी काठीने हल्ला चढवला यात एक तलाठी , आणि कोतवाल यांना मारहाण झाली तसेस तहसिलदार सचिन खाडे यांना शिवीगाळ करण्यात आली या प्रकरणी चंकलाबा पोलीस ठाण्यात आज्ञात लोकांविरूद्ध गुन्हा करण्यात आला आहे.
गेवराईचे तहसिलदार सचिन खाडे, तलाठी संजय नेवडे आणि तिन कोतवाल खाजगी टॅम्पोत बसुन बोरगावच्या दिशेनं रवाना झाले होते अचानक महसुल पथकाने हायवा गाडी थांबवली याचाच राग मनात धरून लोकेशन देण्यासाठी लाल रंगाची चार चाकी गाडी आली आणि त्यांनी या पथकावर काठीने हल्ला चढवला यात एक कोतवाल आणि तलाठी संजय नेवडे गंभीर जखमी झाले आहेत घटनेची माहीती कळताच बीडचे जिल्हाधीकारी राहूल रेखवार यांनी घटनास्थळी धाव घेतली.
गेवराई तहसिल कार्यलयात त्यांनी तलाठी मंडळ अधीकारी यांची बैठक बोलावली या बैठकीत त्यांनी तलाठी मंडळ अधीकारी यांना खडे बोल सुनावले आहेत तुम्ही आपल्या कर्तव्यापासुन लांब पळू नका बेईमानी करू नका तुम्ही अशी हरामखोरी केली नाही तर तूमच्या अंगावर हात टाकायची हिमंत कोणी करणार नाही जी मोकळी वाहने रस्त्याला उभी असतील तुम्हाला संशय जरी आला तर तूम्ही ती पकडा पोलीसांची मदत घ्या पोलीस येत नसतील तर मला सांगा आपल्या कर्तव्याशी बेईमानी कराल तर याद राखा जर तूम्ही निट राहीले तर तूमच्यावर हात टाकायची हिमंत कूणी करणार नाही मी तूमच्या पाठीशी आहे लक्षात घ्या असे त्यांनी यावेळी सांगितले याठिकाणी उपविभागीय अधीकारी अविनाश टिळेकर, तहसिलदार सचिन  खाडे, नायब तहसिलदार सुहास हजारे,  नायब तहसिलदार प्रशांत जाधवर यांच्यासह तलाठी, मंडळ अधीकारी उपस्तीथ होते 
पोलीस मदत करत नाहीत – तलाठी मंडळ अधीकारी
 आपण कार्यवाही करण्यास गेल्यानंतर पोलीस यंत्रना मदत करत नाही उलट माफियाला पथक येत असल्याची माहीती देतात अशा खळबळ जनक खुलासा तलाठी मंडळअधीकारी यांनी  बैठकीत जिल्हाधीकारी यांच्यासमोर केला आहे.
रिपोर्ट केला नाही तर कार्यवाही करणार
आपल्या सज्यातील तसेच महसुली मंडळामध्ये कोन वाळू उपसा करतयं यांची माहीती गोळा करा जर मला तलाठी मंडळ अधीकारी यांच्या वैतिरीक्त तिस-या लोकांनी माहीती पाठवली तर त्या तलाठी मंडळ अधीकारी यांच्यावर कार्यवाही करणार असल्याचेही जिल्हाधीकारी राहूल रेखवार यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here