Home मराठवाडा राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी 12 सदस्यांची यादी राज्यपालांकडे सुपूर्द

राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी 12 सदस्यांची यादी राज्यपालांकडे सुपूर्द

504
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या नावाची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी  यांना सादर केली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब केल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ही यादी राज्यपालांकडे सुपूर्द केली. या यादीतील काही नावं समोर आली आहेत. एकनाथ खडसे, सचिन सावंत, रजनी पाटील या उमेदवारांची नावं यादीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या नावावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब केल्यानंतर आज अखेर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ही यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सादर केली. आज संध्याकाळी 6 च्या सुमारास अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, परिवहन मंत्री अनिल परब आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी राज्यपालांची भेट घेतली. यावेळी या तिन्ही मंत्र्यांनी आपआपल्या कोट्यातील राज्यपाल नियुक्त सदस्यांची यादी राज्यपालांना दिली.

12 सदस्यांमध्ये कोणाची नावं?

काँग्रेस

1) सचिन सावंत – सहकार आणि समाजसेवा

2) रजनी पाटील – सहकार आणि समाजसेवा

3) मुजफ्फर हुसैन – समाजसेवा

4) अनिरुद्ध वणगे – कला

राष्ट्रवादी काँग्रेस

1) एकनाथ खडसे

2) राजू शेट्टी – सहकार आणि समाजसेवा

3) यशपाल भिंगे – साहित्य

4) आनंद शिंदे – कला

शिवसेना

1) उर्मिला मातोंडकर – कला

2) नितीन बानगुडे पाटील-

3) विजय करंजकर –

4) चंद्रकांत रघुवंशी –

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here