Marathwada Sathi

राज्यातील शाळा व महाविद्यालये चालू होऊन नौकर भरती सुरु करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना लिहिले विनंती पत्र

गंगाखेड : राज्यातील शाळा व महाविद्यालये चालू करून राज्यातील नौकर भरती चालू करण्यात यावी याबाबत विनंती पत्र महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गंगाखेडचे सामाजिक कार्यकर्ते गजानन कोंडीबा पारवे यांनी लिहिले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केलेली विनंती
आपल्या महाराष्ट्र राज्यात कोव्हीड १९ या आजारामुळे शाळा व महाविद्यालये गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. राज्यात ऑनलाइन शिक्षण पद्धती चालू केली परंतु गरीब पालक वर्गाकडे ऍडरॉईड मोबाईल नसल्यामुळे गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. महाराष्ट्रातील शाळा व महाविद्यालये हे दीपावली च्या नंतर डिसेंबर,जानेवारी महिन्या पर्यंत तात्काळ चालू करण्यात यावेत जेणेकरून विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारमय होणार नाही.राज्यातील नौकर भरती देखील बंद आहे. त्यामुळे देखील ज्या सुरक्षित बेरोजगार डिकी पदवी घेऊन देखील नौकर भरती नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच रोज बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. काही विध्यार्थी हे निराशमय जीवन कंठीत आहेत. त्यांना देखील न्याय मिळणे गरजेचे आहे.


Exit mobile version