Home औरंगाबाद चलो समताधिष्ठित भारत की ओर…,जयभीम दिनानिमित्त परभणीत होणार जागर!

चलो समताधिष्ठित भारत की ओर…,जयभीम दिनानिमित्त परभणीत होणार जागर!

88
0

मक्रणपूर परिषद आणि जयभीम दिनानिमित्त -जयभीम जागर-2020 चे आयोजन

औरंगाबाद : 1938 साली डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत 30 डिसेंबरला औरंगाबाद जिल्ह्याच्या मक्रणपूर येथे सीमा परिषद संपन्न झाली. या परिषदेत जय भीम या क्रांतिमंत्राचा जयघोष झाला. तेव्हापासून येथे दरवर्षी जयभीम परिषदेचे अखंड आयोजन करण्यात येते.
यंदाची परिषद कोरोनाच्या सावटामुळे दरवर्षी प्रमाणे भव्यदिव्य होणार नाही; पण यानिमित्ताने ठिकठिकाणी जयभीम सेलिब्रिशनचे आयोजन करण्यात आले आहे. हाच धागा पकडून परभणी येथे जयभीम जागर-2020 संपन्न होत आहे.

जयभीम जागर-2020 :
परभणी येथे सायंकाळी 6 वाजता रविराजपार्क विपश्यना केंद्रात यंदाचा जयभीम जागर कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पूज्य भदंत डाॅ. उपगुप्त महास्थवीर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आंबेडकरवादी चळवळीतील ज्येष्ठ नेते बी.एच. सहजराव, लोकनेते विजय वाकोडे, युवानेते सिद्धार्थ हत्तीअंबिरे, महावंदना आयोजन समितीचे सक्रीय सदस्य डाॅ. बी.टी. धुतमल यांची उपस्थिती असणार आहे.

सहभाग नोंदवण्याचे भीमप्रकाश गायकवाड यांचे आवाहन :
परभणी महापालिकेच्या महापौर अनिता रवींद्र सोनकांबळे, पूज्य भदंत मुदितानंद थेरो, डाॅ. वर्षा सेलसुरेकर, संविधान जागृती अभियानचे संस्थापक अॅड अमोल गिराम यांच्या उपस्थितीत प्रमुख वक्ते प्रा. डाॅ. भीमराव खाडे, काॅ. गणपत भिसे आणि ज्योती बगाटे हे जयभीमचा जागर घालतील.

चलो समताधिष्ठित भारत की ओर…
जय भीम !
जय संविधान !!
जय भारत !!!

या परिषदेत आपला सहभाग नोंदविण्याचे आवाहन मुख्य संयोजक भीमप्रकाश गायकवाड आणि गौतम मुंढे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here