Home मराठवाडा बेनसुर परिसरात बिबट्याचा वावर

बेनसुर परिसरात बिबट्याचा वावर

शेतकरी, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

31
0
संग्रहित छायाचित्र

पाटोदा : गेल्या महिनाभरापासून शिरूर व पाथर्डी तालुक्याच्या सीमेवर बिबट्याचा वावरामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असताना पाटोदा तालुक्यातील बेंनसुर -थेरला शिवारात एक वाघ दिसल्याने या परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
  पाटोदा तालुक्यात बेनसुर, भायाळा ,रोहतवाडी, डोमरी नायगाव परिसरात डोंगराळ भूभाग असल्याने वन्य प्राण्यांना लपण्यास अनुकूल वातावरण आहे. या भागात हरीण, मोर, लांडोर, रानडुक्कर, ससा यासारखे प्राणी व पक्षी मोठ्या प्रमाणावर आढळतात.  मात्र दि.९ रोजी बेनसुर हद्दीत एक वाघ दिसल्याने नागरिकांत  घबराट निर्माण झाली आहे. भायाळा येथील कृष्णा दादासाहेब बांगर यांची बेनसुर हद्दीत जमीन आहे  ही जमीन बेनसुर व थेरला सीमेवर आहे.  ते दि. ९  रोजी शेतातुन काम आटोपून  गावाकडे जात असताना थेरला -बेनसुर शिवारात रस्त्याच्या कडेला वाघ दिसल्याचे कृष्णा बांगर या युवकाने बेनसुर येथील नागरिकांना सांगितले.  त्यानंतर बेनसुर येथे रात्री दवंडी देऊन नागरिकांना जागृत करण्यात आले. जून -जुलैमध्ये  सर्वत्र लॉक डाऊन असताना नायगाव मयूर अभयारण्य परिसरात चरण्यासाठी गेलेल्या जनावरांवर बिबट्याने हल्ला केला होता. पुन्हा बेनसुर परिसरात वाघ दिसल्यानंतर  हाच वाघ नायगाव शिवारात दोन महिन्यांपूर्वी दिसल्याचे नागरिक सांगतात.  त्यामुळे वनविभागाने तातडीने या वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी थेरला ,बेनसुर , भायाला परिसरातील नागरिकांची केली आहे. या वाघाने दि. १० नोव्हेंबर २०२० रोजी एका कुत्र्याला फाडलेले आढळले. त्यामुळे घाबरलेल्या बेनसुरच्या नागरिकांनी वन विभागाकडे या प्राण्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली असुन या निवेदनावर  सरपंच परशुराम आडसुळ व चेअरमन तात्यासाहेब आडसुळ यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here