Home क्राइम बीड मध्ये बिबट्याची दहशत ….

बीड मध्ये बिबट्याची दहशत ….

232
0

मराठवाडसाथी न्यूज

बीड : बीड मधील आष्टी तालुक्यातील सुरुडी किन्ही व पारगाव जोगेश्वरी येथे नरभक्षक बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तीन व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला. तालुक्यात बिबट्याची दहशत निर्माण झाली असल्याने या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाचे पथक मंगळवारी (ता. एक) पारगाव जोगेश्वरी, वाळुंज परिसरात अहोरात्र शेतशिवार रानोमाळ भटक होते. बिबट्याने नागनाथ गहिनीनाथ गर्जे (सुरुडी), स्वराज सुनील भापकर (किन्ही) आणि सुरेखा नीळकंठ बळे (पारगाव जोगेश्वरी) या तीन व्यक्तींचा बळी घेतला. बिबट्याला पकडण्यासाठी औरंगाबाद, नांदेड, पुणे, जुन्नर तसेच बीडच्या पथकातील जवळपास एकशे पंचवीस अधिकारी व कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. दरम्यान, अजून बिबट्या सापडला नसल्याने आष्टी तालुक्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात भयभीत झाले आहेत. बिबट्याला वन विभागाने तत्काळ जेरबंद करण्याची मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here