Marathwada Sathi

लव्ह जिहादविरोधात कायदा ,महाराष्ट्रात विचार करू – संजय राऊत

मुंबई : लव्ह जिहादविरोधात बिहारमध्ये कायदा झाल्यानंतर महाराष्ट्रात विचार करु, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेत्यांना टोला लगावला. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात लव्ह जिहादविरोधात कायदा करण्यात आला आहे. त्यावरुन भाजपच्या काही नेत्यांकडून महाराष्ट्रात हा कायदा कधी आणणार अशी विचारणा केली जात होती. त्यावेळी संजय राऊत यांनी भाष्य केलं. मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी वाढीव वीज बिलविरोधात भाजपचं आंदोलन, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी तसंच देवेंद्र फडणवीस-अजित पवार यांनी गुपचूप उरकलेल्या शपथविधीच्या वर्षपूर्वीच्या मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली.

भाजपशासित मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात लव्ह जिहादविरोधात कायदा करण्यात आला आहे. यावरुन महाराष्ट्रात कधी कायदा करणार अशी विचारणा भाजप नेते वारंवार करत होते. त्यावर संजय राऊत म्हणाले की, “लव जिहादबाबत आज सकाळीच माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये कायदा बनू दे. पण बिहारमध्ये जेव्हा नितीश कुमार कायदा बनवतील तेव्हा त्या कायद्याचा आम्ही अभ्यास करु आणि त्यानंतर महाराष्ट्रात कायद्याबाबत विचार करु. बिहारमध्ये भाजपचीच सत्ता आहे. नितीश कुमारही त्यांचेच मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे तिथे कायदा झाल्यानंतर महाराष्ट्रात विचार करु. लव्ह जिहादपेक्षा अर्थव्यवस्था, बेरोजगारी, महागाई हे मुद्दे सर्वात मोठे आहेत.”

Exit mobile version