Home क्रीडा धोनीचा “Latest” लुक

धोनीचा “Latest” लुक

4446
0

मुंबई : काहीच दिवसांपूर्वी धोनीला मुंबईमध्ये पाहण्यात आलं. एका जाहिरातीच्या शूटिंगसाठी तो मुंबईत आला होता. धोनीचे फोटो काढण्याची एकही संधी न सोडणाऱ्या त्याच्या चाहत्यांनी यावेळीही त्याचे फोटो काढले आणि लगेचच सोशल मीडियावर पोस्ट केले. यानंतर काही वेळातच हे फोटो व्हायरलही झाले. या फोटोंमध्ये धोनीचा नवा लूक समोर आला आहे.

एमएस धोनीने त्याची पांढरी दाढी काढून टाकली आहे, तसंच हेयरस्टाईलही बदलली आहे. मागच्या एका वर्षात धोनीने बऱ्याच वेळा त्याचा लूक बदलला आहे. लॉकडाऊनच्या काळात धोनी पांढऱ्या दाढीमध्ये दिसला होता, त्यावेळी त्याला ओळखणंही कठीण झालं होतं. यानंतर आयपीएल 2020 मध्येही त्याने हेयरस्टाईल बदलली. आता नव्या वर्षातही धोनी नव्या रूपात त्याच्या चाहत्यांसमोर आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here