Home परळी वैजनाथ स्व.मोहनलालजी बियाणी यांनी पत्रकारीतेचे धडे शिकविले –लक्ष्मण वाकडे

स्व.मोहनलालजी बियाणी यांनी पत्रकारीतेचे धडे शिकविले –लक्ष्मण वाकडे

2402
0

पक्षांसाठी चारा-पाणवठे तर गरीब व गरजूंना ब्लँकेटचे वितरण

परळी । पत्रकारीतेत दिवसेंदिवस बदल होत असतांना मी बातमीदार झाले त्यावेळी स्व.मोहनलालजी बियाणी मराठवाडा साथीचे मुख्य संपादक म्हणून कार्यरत होते. ट्रेडलपासून रंगीत ऑफसेटपर्यंत मराठवाडा साथी व काकाजींचा प्रवास झाला असून, त्यांनी जसजसे छपाईतील बदल स्विकारले अगदी त्याच पध्दतीने आम्हाला बदलत चाललेल्या पत्रकारीतेतील धडे शिकविले असून, मोहनलालजी बियाणी हे आमच्यासाठी पत्रकारीतेच चालते-बोलते विद्यापीठच होते असे मत जेष्ठ पत्रकार लक्ष्मण वाकडे यांनी व्यक्त केले.

दै.मराठवाडा साथीचे संस्थापक संपादक स्व.मोहनलालजी बियाणी यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात लक्ष्मण वाकडे बोलत होते. स्व.मोहनलालजी बियाणी अन्नक्षेत्र येथे पार पडलेल्या कार्यक्रमात तृतीय पुण्यस्मरणाचे औचित्य साधून पक्षांसाठी चारा व पाणी एकत्रीत ठेवण्याची व्यवस्था असलेल्या १०१ डब्यांचे (भांडे) वितरण, गरजूंना वस्त्रवाटप व महाशिवरात्री निमित्त फराळाचे वितरण करण्यात आले. प्रारंभी स्व.मोहनलालजी बियाणी यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. कार्यक्रमास डॉ.पुनमचंद कांकरीया, मुख्य संपादक चंदुलाल बियाणी, संपादक सतिश बियाणी, रमेश भोयटे, विद्यार्थी सेनेचे जिल्हा प्रमुख प्रा.अतुल दुबे, रवि गुळभिले, पत्रकार धनंजय आरबुने, प्रशांत प्र.जोशी, दत्तात्रय काळे, ओमप्रकाश बुरांडे, संभाजी मुंडे, जगदीश शिंदे, आनंद हाडबे, संजय देवधारे, अजय पुजारी, शुभम चव्हाण आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी स्व.मोहनलालजी बियाणी यांच्या पत्रकारीतेतील तसेच सामाजिक चळवळीतील आठवणींना उजाळा दिला. आपल्या भाषणात पुढे बोलतांना लक्ष्मण वाकडे म्हणाले की, मोहनलालजी बियाणी यांच्या बातमीत बात असायची परंतू त्यांनी कधीच मी पणा दाखवला नाही. रेल्वेपासून शहरातील साध्या समस्येपर्यंत त्यांनी आंदोलने केली असून, सरकारचे लक्ष वेधण्यासाठी केवळ बातमी नाही तर प्रसंगानुसार ते रस्त्यावर उतरतही होते याचा अवर्जून उल्लेख वाकडे यांनी केला. डॉ.पुनमचंद कांकरीया यांनी पक्षांसाठी ठेवलेल्या भांड्यांचे व त्याच्या वितरणाचे कौतुक केले तर रमेश कोमावर यांनी चंदुलाल बियाणी हे उपक्रमशिल असतात असे सांगत जे आवश्यक ती समाजसेवा त्यांच्याकडून पहायला मिळते असे कोमावर म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here