Marathwada Sathi

शेवटची ऑर्डर साडे नऊ वाजता…!

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : घरातल्या पार्टीसाठी ऑनलाईन फूडची ऑर्डर देणार असाल तर ती रात्री ९:३० वाजेपर्यंतच द्यावी, रात्री ९:३० वाजेपर्यंतच्या अशा प्रकारच्या ऑर्डर स्वीकारण्याचा निर्णय आहार ने घेतला असल्याचं आहारचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी सांगितलंय.कोरोनाच्या नव्या स्ट्रेनपासून असलेला धोका लक्षात घेता राज्य सरकारनं नाईट कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर यंदा ९:३० पर्यंतच शेवटची ऑर्डर स्विकारण्याचा निर्णय आहारने घेतला आहे. रात्री ११ नंतरच्या नाईट कर्फ्यूत फूड डिलिव्हरी करणाऱ्यांना प्रशासनानं अद्याप कोणतीही सूट दिली नाही. त्यामुळे पोलिसांचा उगाच ससेमिरा नको, म्हणून आहारनं हा निर्णय घेतला आहे. आहारचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी यांनी बोलताना स्पष्ट केलं की, हॉटेल, बार, रेस्टॉरंट,पब्ज हे सारं काही रात्री ११ वाजता बंद होईल. मात्र लोकं जर घरी राहून थर्टी फर्स्ट साजरा करणार असतील तर त्यांना पार्सल पोहचवण्यासाठी डिलिव्हरी बॉईजना किमान रात्री दिड वाजेपर्यंत परवानगी द्यायला हवी. थर्टी फर्स्टच्या रात्री त्रास नको म्हणून ११ ची डेडलाईन पाळणं आवश्यक आहे. त्यामुळे रात्री ९:३० पर्यंतच पार्सलची शेवटची ऑर्डर स्विकारण्याचा एकमेव पर्याय शिल्लक आहे.

Exit mobile version