Home अर्थकारण राजस्थानी मल्टिस्टेटच्या ग्राहक सेवा केंद्रामुळे मोठी रोजगार निर्मिती – कृष्णात चन्ने

राजस्थानी मल्टिस्टेटच्या ग्राहक सेवा केंद्रामुळे मोठी रोजगार निर्मिती – कृष्णात चन्ने

9171
0

तात्काळ बँकिंग मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबिर संपन्न

देशातील 498 बँकांच्या सेवा आता एकाच छताखाली

औरंगाबाद : राजस्थानी मल्टिस्टेटच्या तात्काळ बँकिंग ग्राहक सेवा केंद्रामुळे शहरापासून गावपातळीवर मोठ्याप्रमाणात रोजगार निर्मिती होणार असून यामुळे बेरोजगारांना उद्योग-व्यवसायाच्या जोरावर यशस्वी होण्याची महासंधी यानिमित्ताने उपलब्ध झाली आहे. ही सेवा देणारी राजस्थानी मल्टिस्टेट ही देशातील पहिलीच बँक ठरली आहे. असे प्रतिपादन गो कॅशलेस इंडिया प्रा. लि. कंपनीचे चेअरमन डॉ. कृष्णात चन्ने यांनी केले. सोमवारी राजस्थानी मल्टिस्टेट तात्काळ बँकिंग ग्राहक सेवा केंद्र संदर्भात औरंगाबाद येथील जैस्वाल हॉल येथे प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात स्व. मोहनलालजी बियाणी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजस्थानी मल्टिस्टेटचे चेअरमन तथा दै. मराठवाडा साथीचे मुख्य संपादक चंदूलाल बियाणी, प्रमुख पाहुणे म्हणून राजस्थानी मल्टिस्टेटचे मॅनेजिंग डायरेक्टर जगदीश बियाणी, कोषाध्यक्ष विजय लड्डा, मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.बी. कुलकर्णी, आरोग्य मित्र संघटनेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभू गोरे उपस्थित होते.

देशातील सर्व बँकांच्या ग्राहकांना तात्काळ बँकिंगच्या माध्यमातून तब्बल 498 बँकांशी अवघ्या नऊ सेकंदात सर्व प्रकारचे व्यवहार करता येणार आहेत. यात 20 हजार सेवा उपलब्ध असून ही सेवा देणारी राजस्थानी मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड ही राज्यातील पहिलीच बँक आहे. आता राजस्थानी मल्टिस्टेटद्वारे जिल्ह्यापासून गावापर्यंत ग्राहक सेवा केंद्र दिली जाणार आहेत.
पुढे बोलताना डॉ. चन्ने म्हणाले की, कोरोनामुळे देशभरात दोन कोटीहून अधिक लोकांच्या नौकऱ्या गेल्या. अशा परिस्थितीत राजस्थानी मल्टिस्टेट तळागाळातील युवकांसाठी रोजगार निर्माण करत पैसे कमावण्याची संधी देत आहे. राजस्थानी मल्टिस्टेटने तात्काळ बँकिंग ग्राहक सेवा केंद्र देण्याच्या उपक्रमाची परळी येथून मुहूर्तमेढ रोवली आहे. भविष्यात देशभरात या उपक्रमाचे नाव होईल याचे सर्व श्रेय बियाणी राजस्थानी मल्टिस्टेट व बियाणी कुटुंबियांचे राहील असे गौरवोद्गार डॉ. चन्ने यांनी काढले. या कार्यक्रमासाठी मोठ्यासंख्येने मराठवाडाभरातून नागरिक उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी आयएमसीचे अनिल जयतपाळ, शेख खलील, फ्युचर फस्ट फायनान्स सर्व्हिसेसचे निशांत खंडेलवाल आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविणा कन्नडकर यांनी तर आभार ग्रुप सीईओ चंद्रशेखर ददीच यांनी मानले.

ग्राहक सेवा केंद्राचे फायदे
एटीएम, आधार, क्यू आर कोड आणि बायोमेट्रिक पद्धतीने पैसे काढता येतात. विशेष म्हणजे क्रेडिट कारद्वारे देखील ग्राहकांना रक्कम काढता येते. तसेच देशातील सर्व राष्ट्रीयकृत बँकांसह 498 बँकांचे व्यवहार एकाच छताखाली करण्याची सुविधा आहे. यासाठी एक अद्यावत पोज मशिन बँकेतर्फे देण्यात येते. त्यावर पैसे, काढणे, पाठवणे, भरणे, सर्व प्रकारचे रिचार्ज, लाईटबिल, क्रेडिट कार्ड बिल, टॅक्स, कर्ज हप्ते आदी सेवा उपलब्ध आहेत. आयएमपीएस, एनएफटी, आरटीजीएस, यूपीआय आदी सेवा देखील आहेत. त्यामुळे अवघ्या नऊ सेकंदात कोणताही व्यवहार या सॉफ्टवेअरद्वारे करता येतो. यासोबतच बारा कंपन्यांचे विमा पॉलिसी सुविधा देखील ग्राहक सेवा केंद्रात असणार आहे. या ग्राहक सेवा केंद्राच्या माध्यमातून महिनाकाठी भरघोस कमाई करण्याची संधी आहे.

गाव सक्षम तर देश सक्षम – चंदूलाल बियाणी

गेल्या 32 वर्षांपासून राजस्थानी मल्टिस्टेट ग्राहकांच्या सेवेत कार्यरत आहे. देशात ग्राहक सेवा केंद्र उपलब्ध करून देणारी राजस्थानी मल्टिस्टेट पाहिलीच संस्था असून औरंगाबाद येथे आज याची सुरुवात करत आहोत. तात्काळ मिनी बँकेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील हजारो बेरोजगारांना रोजगार देण्याची संधी आम्ही राजस्थानी मल्टिस्टेटच्या माध्यमातून देत आहोत. ही मिनी बँक दुकानदार, व्यवसायिक, सेतू सुविधा केंद्र, मेडिकल यासह अन्य कोणतेही व्यापारी घेऊ शकतात. त्यांना उद्योजक बनवण्यासाठी राजस्थानी मल्टिस्टेट कर्ज देखील उपलब्ध करून देणार आहे. लॉकडाऊन काळात या तात्काळ बँकिंगचा हजारो ग्राहकांनी फायदा घेतला. त्यामुळे याचे महत्व लोकांना समजले असे प्रतिपादन राजस्थानी मल्टिस्टेटचे चेअरमन चंदूलाल बियाणी यांनी केले. राज्याचे सामाजिक व न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील तात्काळ बँकिंग सेवेचे कौतुक केले आहे.

आयएमसी आयुर्वेदिक औषधांमुळे राहा निरोगी

या कार्यक्रमात आयएमसी ही जागतिक दर्जाचे आयुर्वेदिक औषधी निर्माण करणाऱ्या कंपनीचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते. त्यांनी केमिकलयुक्त आहारामुळे नागरिकांचे आरोग्य कसे धोक्यात आले आहे हे सांगून त्यांनी आयएमसीचे श्रीतुलसी, आलोविरा, साबण यासह 550 उत्पादनामुळे कसे निरोगी राहता येईल याचे प्रात्यक्षिक करून दाखवले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here