Marathwada Sathi

२०२६ ला लडाख होणार स्वित्झर्लंडसारखे !

स्वित्झर्लंडसारखे “टुरिस्ट पॉईंट ” होणार लडाखमध्ये -जोझिला बोगदा (Zojila Tunnel) जेड-मोडच्या मध्ये असणाऱ्या 18 किलोमीटरच्या पट्ट्यात होणार टुरिस्ट स्टेशन.

लडाख :मागील वर्षी जम्मू काश्मीरचे विभाजन करून नवीन लडाख व जम्मू काश्मीर हे केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात आले. त्यानंतर आता सरकारने लडाखवर विशेष लक्ष केंद्रित केले असून लडाखमध्ये टुरिस्ट स्टेशन विकसित केलं जाणार आहे. यासाठी प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरु झाल्या असून लडाख आणि जम्मू काश्मीरच्या उपराज्यपालांबरोबर या संदर्भात चर्चा सुरु झाल्या आहेत. भारतात चीनसारखा काचेचा पूल बांधण्यात आला आहे तशाच प्रकारे आणखीन एक पर्यटन स्थळ तयार करण्यावर भर देण्यात येणार आहे.

स्वित्झर्लंडमधील दावोस सारखे “टुरिस्ट स्टेशन “:
पर्यटन आणि रोजगार दोन्ही वाढीस लागण्यासाठी प्रशासन त्यावर नियोजन करत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, लडाखमधील जोझिला बोगदा (Zojila Tunnel) जेड-मोडच्या मध्ये असणाऱ्या 18 किलोमीटरच्या पट्ट्यात हे टुरिस्ट स्टेशन बनवलं जाणार आहे. स्विझर्लंडमधील दावोस प्रमाणे हे टुरिस्ट स्टेशन तयार केलं जाणार असून, पर्यटकांना याचा मोठा लाभ होणार आहे.या टुरिस्ट स्टेशनचे डिझाईन खास स्विझर्लंडमधील आर्किटेक्टकडून तयार करून घेतलं जाणार आहे.

6 वर्षांत होणार लडाख “स्वित्झर्लंड “

पुढील सहा वर्षांमध्ये हा प्रोजेक्ट पूर्ण होणार असून प्रशासकीय स्तरावर यासाठी हालचाली सुरु आहेत.

Exit mobile version