Marathwada Sathi

क्या बात है! १ रुपयाच्या शेअरची कमाल, काही वर्षातच ५५९००% रिटर्न्स

मुंबई : शेअर बाजाराने अनेकांना गरिबीतून श्रीमंतीकडे नेले आहे. मार्केटमधील गुंतवणुकीत जितका धोका आहे, तितका फायदा देखील आहे. म्हणूनच शेअर बाजाराचे गणित समजून घेतल्यास तुम्ही रातोरात मालामाल होऊ शकता, असे म्हणतात. पण थोडीशीही चूक झाली तर तुम्हाला कंगाल व्हायला वेळ लागणार नाही. हिंदुस्तान फूड्स नावाच्या स्मॉल कॅप कंपनीचा शेअर गुंतवणूकदारांसाठी तसा मल्टीबॅगर ठरला आहे. या स्टॉकने गेल्या ११ वर्षांत जबरदस्त परतावा दिलेला आहे.

स्मॉलकॅप कंपनी हिंदुस्तान फूड्सच्या शेअर्सने गेल्या ११ वर्षांत जोरदार कामगिरी करत आपल्या गुंतवणूकदारांना शानदार परतावा दिला आहे. या कालावधीत कंपनीच्या समभागांनी गुंतवणूकदारांना ५५९००% परतावा दिला आहे. हिंदुस्थान फूड्सचे शेअर्स २१ ऑगस्ट २०१२ रोजी फक्त एक रुपयांवरून ५६० रुपयांपर्यंत वाढले. हिंदुस्थान फूड्सच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची उच्चांक पातळी ७४९.१५ रुपये तर ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी ३२८.७३ रुपये आहे.

२१ ऑगस्ट २०१२ रोजी हिंदुस्थान फूड्सचे शेअर्स फक्त एक रुपयात उपलब्ध होते, तर सध्या स्टॉक ५६४३५% वाढीसह ५६५.३५ रुपयांवर पोहोचला आहे म्हणजे अवघ्या १८,००० रुपयांच्या गुंतवणुकीसह गुंतवणूकदारांचे भांडवल झटपट १ कोटी रुपये झाले असेल. मात्र, अलीकडे त्यात ९% घट झाली असून सध्या, हिंदुस्तान फूड्सचे शेअर्स BSE वर ५६५.३५ रुपये आहेत. तर कंपनीचे संपूर्ण मार्केट कॅप ६,३७३.९१ कोटी रुपये आहे. गेल्या वर्षी, २१ ऑगस्ट रोजी स्टॉक विक्रमी पातळीवर पोहोचला होता. यानंतर, पुढील सहा महिन्यांत ५ डिसेंबर २०२२ रोजी ते १२८% वाढीसह ७४९.१५ रुपयांच्या उच्चांकावर पोहोचले. मात्र, शेअर्सची तेजी इथेच थांबली आणि सध्या ते या पातळीपासून २५% घसरले आहेत. गुरुवारी बंद झालेल्या ट्रेडिंग सत्रात शेअर दीड टक्क्यांहून अधिक वाढून ५६५.२५ रुपयांवर पोहोचला.हिंदुस्तान फूड्स ही FMCG विभागातील कंपनी आहे. हे लॅक्मे, मूव्ह, Decold, विम, वीट, नायसिल, हार्पिक, ब्रुक बाँड, रेड लेबल, ब्रू, सनसिल्क, क्लिनिक प्लस, संतूर, रीन, डेटॉल आणि Knorr सारख्या सुप्रसिद्ध ब्रँड्सची उत्पादने बनवते. प्रवर्तकांचा त्यात ६४.८५ टक्के हिस्सा आहे.

Exit mobile version