Home Uncategorized क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले दिनदर्शिका २०२१ प्रकाशित!

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले दिनदर्शिका २०२१ प्रकाशित!

113
0

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले दिनदर्शिका २०२१ चे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन सोहळा संपन्न झाले.
परळी शहरातील संत सावता माळी नगर भागातील महात्मा फुले चौक येथे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस भाजपाचे शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या प्रसंगी  क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले दिनदर्शिका २०२१ चे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन सोहळा संपन्न झाले. या प्रसंगी भा.ज.यु.मोर्चाचे प्रदेश सचिव ऍड.अरूण पाठक, युवानेते योगेश पांडकर, दै.मराठवाडा साथीचे वृत्तसंपादक दत्तात्रय काळे, दै.गावकरी चे प्रतिनिधी जगदिश शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थि होते. यावेळी मान्यवरांचे स्वागत कार्यक्रमाचे सयोजक दत्ता लोखंडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोपीनाथ घोडके, गणेश सावंत, रमेश बनसोडे, नेताजी लोखंडे, शुभम बनसोडे, बालाजी बनसोडे, सखाराम बनसोडे, महादेव क्षीरसागर, महेश जुनाळ, दशरथ भोकरे आदींनी परिक्षम घेतले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here