Marathwada Sathi

कोविडयोद्धा डॉ.सनाउल्लाह खान यांचा आखाडा बालापुरात सत्कार

बालापूर : कोरोना काळात वसमत उपजिल्हा रूग्णालयात कोरोनासेंटर प्रमुख म्हणुन उत्कृष्ट कार्य करणारे वैद्दकीय अधिकारी डॉ.सनाउल्लाह खान यांचा आखाडा बालापुरात मुस्लिम सेवासंघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. कोरोना योद्धा म्हणुन आरोग्य सेवा बजावत कोरोना लसीकरण बाबत जनजागृती करत डॉ.सनाउल्लाह खान यांनी आदर्श कर्तव्य बजावले. त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. त्यांनी एक आदर्श निर्माण केल्याची भावना यावेळी आयोजकांनी व्यक्त केली केली.

सामाजिक कार्यकर्ता सय्यद नसीम,हाजी माजीद खान पठान, शेख सिराज, युवानेते गुफरान कुरैशी, मुस्लिम सेवासंघ अध्यक्ष शेख अज्जु, माजी ग्रामपंचायत सदस्य गुलाम मोहम्मद,सय्यद फारूख, शेख आयुब यांनी डॉ.सनाउल्लाह खान यांच्या कार्याचा गौरव करत त्यांचा सत्कार केला. यावेळी हाजी शेख मुसा,इनायत खान,कीरण सुर्यवंशी, जफरूलाखान पठान, शेख फारूख गिरगावकर, मोहम्मद शोएब, मोहम्मद अखीब,मोहम्मद तोहीद,मोहम्मद उवेस यांची उपस्थिती होती.

Exit mobile version