Home बीड सणासुदीत उपयोगी येणाऱ्या ३१ वस्तूंचे किट मिळणार फक्त १ हजार रूपयांत!

सणासुदीत उपयोगी येणाऱ्या ३१ वस्तूंचे किट मिळणार फक्त १ हजार रूपयांत!

मारवाडी युवा मंचचा दिवाळीसाठी खास उपक्रम

333
0

परळी । दिवाळीचा उत्सव म्हणजे सर्वांसाठी आनंदाची एक मोठी पर्वणीच असतो. दिवाळीच्या काही दिवस अगोदर प्रत्येक घराघरांत खरेदीची लगबग असते. कपड्यांपासून फराळाच्या साहीत्यापर्यंत अशा सर्वकाही गोष्टी खरेदीसाठी धावपळ असलेली आपल्या सर्वांनाच पहावयास एरव्ही मिळते. सर्वच गोष्टी वेगवेगळ्या ठिकाणी जावून खरेदी करण्यापेक्षा जर हे एकाच ठिकाणी जावून खरेदी करता आलं तर? होय… हे शक्य आहे. मारवाडी युवा मंच, परळी वैजनाथ यांच्या वतीने ना नफा ना तोटा या तत्वावर ३१ वस्तुंचे किट फक्त एक हजार रूपयांत उपलब्ध करून दिले आहे. राजस्थानी नागरी पतसंस्था व राजस्थानी मल्टीस्टेटच्या सर्व शाखा व मुरली फ्रुट आणि डेली मिल, मोंढा येथे हे किट प्रत्येकाला जावून खरेदी करता येणार आहे.

मारवाडी युवा मंच, परळी वैजनाथ यांच्या वतीने दिवाळीत आवश्यक असणाऱ्या ३१ वस्तुंचे किट ना नफा ना तोटा तत्वावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामध्ये दिवाळी फराळाच्या वस्तू, पुजेचे साहीत्य, सुगंधीत उटणे, साबण, आकाश कंदीर, पणत्या आदी वस्तूंचा समावेश आहे. हे किट खरेदी करणारांना फक्त १ हजार रूपये एवढ्या कमी किंमतीत मिळणार आहे. दि.१० नोव्हेंबर २०२० पर्यंतच ही स्किम खरेदीदारांसाठी उपलब्ध असेल. राजस्थानी नागरी सहकारी पतसंस्थेचे कार्यालय, राजस्थानी मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटीच्या सर्व शाखा व मोंढा मार्केट परळी येथे असलेले मुरली फ्रुट व डेली मिल या दुकानी हे साहीत्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. या उपक्रमाच्या अधिक माहीतीसाठी 9422541571 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

चला त्यांचीही दिवाळी करूया गोड….

असं म्हणतात की, गरजूंना मदत केल्याने त्याचं पुण्य आपल्याला लाभतं. म्हणून दरवर्षी दिवाळीच्या दरम्यान ज्यांच्या घरात दिवाळीचे दीप लागत नाहीत अशा कुटूंबीयांना किंवा अशा असाहाय लोकांना मदतीचा संकल्प असतो. गेल्या अनेक वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. माणूसकीची भिंत… हा उपक्रम आता बाराही महिने गरजूंना मदत व्हावी यासाठी सुरू करण्यात आलेला आहे. आपल्याकडे असलेले अन्न, कपडे, बॅटरी, जुनी सायकल, चष्मा,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here