Marathwada Sathi

खडसेंचा भाजपला रामराम, शुक्रवारी घड्याळ बांधणार; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची माहिती

मुंबई : अखेर एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम केला आहे. ते शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत जयंत पाटील बोलत होते. एकनाथ खडसे यांच्या या निर्णयामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.

जयंत पाटील म्हणाले की, एकनाथ खडसे यांनी भाजप पक्ष सोडला असल्याची माहिती मला मिळाली आहे. शुक्रवारी दुपारी दोन वाजता एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. यावेळी एकनाथ खडसे यांच्यावर भाजपमध्ये अन्याय झाला, असंही ते म्हणाले.

एकनाथ खडसे यांनी बुधवारी सकाळी पक्षाचा राजीनामा दिल्याची माहिती आहे. त्यामुळे त्यांना राष्ट्रवादीत घेण्यात कोणतीही अडचण नाही, असे जयंत पाटील म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येताना त्यांनी कोणतीही अट ठेवली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नेतृत्त्वात काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केल्याचे पाटील यांनी नमूद केले. खूप लोक आमच्या पक्षात येणार असल्याचा दावाही जयंत पाटील यांनी यावेळी केला.

Exit mobile version