Marathwada Sathi

खडसे इडीच्या चौकशीसाठी जाणार…?

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस मिळाल्यानंतर त्यांना आज(३० डिसें) ईडी कार्यालयात उपस्थित रहावे लागणार आहे.काही दिवसांपूर्वी खडसे यांनी त्यांना इडीची नोटीस मिळाल्याचे सांगितले होते.त्यावेळी ‘त्यांना जे सहकार्य लागले ते मी पुरवले आहे. आता देखील सहकार्य करेल,असे असे देखील ते म्हणाले होते.पण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार खडसे त्यांच्या वकीलामार्फत हजर होण्याची शक्यता आहे.ईडी चौकशीच्या निमित्ताने खडसे हे कालच मुंबईत दाखल झाल्याची माहिती आहे.

दरम्यान,भोसरी भूखंड प्रकरणी ही नोटीस आहे. याआधीही चार वेळा चौकशी झाली आहे, ही पाचवी आहे. मी यापेक्षा जास्त बोलू इच्छित नाही.आज मला काहीही सांगायचे नाही,असेही एकनाथ खडसे म्हणाले होते.

Exit mobile version