Home मनोरंजन अभिनेते मनोज तिवारी यांना कन्यारत्न

अभिनेते मनोज तिवारी यांना कन्यारत्न

93
0

नवी दिल्ली: दिल्लीचे खासदार आणि अभिनेते मनोज तिवारी यांच्या घरी मुलीचे आगमन झाले आहे. मनोज तिवारी यांनी ट्वीट करत ही आनंदाची बातमी दिली आहे. सोबतच त्यांनी आपल्या मुलीसोबतचा फोटोही शेअर केला आहे. मनोज तिवारी यांना आणखी एक मुलगी आहे जी मुंबईत शिक्षण घेत आहे.मनोज तिवारी यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, माझ्या घरी एक परी आली आहे. I am blessed with a baby girl… जय जगदंबे.. ” याच ट्वीटसोबत त्यांनी मुलीला घेतलेला एक फोटो देखील शेअर केला आहे.

कन्यारत्न प्राप्तीनंतर मनोज तिवारी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरु झाला आहे.मनोज तिवारी यांचं अभिनंदन करताना दिल्ली भाजप सचिव इम्प्रीत सिंह बख्शी यांनी लिहिलं आहे की, ”लक्ष्मीजींच्या आगमनाच्या आपल्याला आणि आपल्या परिवाराला खूप शुभेच्छा” मनोज तिवारी यांनी 2013 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here