Marathwada Sathi

‘सरदार वल्लभभाई पटेल’ यांच्या जयंती निमित्त कंगनाने केले ट्विट

मुंबई : वल्लभभाई पटेल हे एक भारतीय राजकीय व सामाजिक नेते होते. त्यांना भारतीय महिलांनी ‘सरदार’ ही उपाधी दिली. वल्लभभाई पटेल पेशाने वकील होते.वकिली करीत असताना ते महात्मा गांधींच्या प्रभावाखाली आले. गुजरातच्या खेडा,आणंद जिल्ह्यातील बोरसद आणि सुरत जिल्ह्यातील बारडोली तालुक्यातील खेडुतांना संघटित करून त्यांनी इंग्रजी अत्याचाराविरुद्ध सत्याग्रह केला. या सत्याग्रहानंतर त्यांची गणना गुजरातच्या प्रभावशाली नेत्यांमध्ये होऊ लागली. भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसचे ते एक महत्त्वाचे नेते होते. १९३४ व १९३७च्या निवडणुकांमध्ये त्यांनी पक्षाचे संघटनही बांधले.

भारत छोडो आंदोलनात ते आघाडीवर होते.वल्लभभाई पटेल हे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान झाले. या रूपात त्यांनी पाकिस्तानातून आलेल्या आणि पंजाब व दिल्ली येथे राहणार्‍या निर्वासितांच्या मदतीसाठी खूप काम केले. फाळणीनंतर उफाळलेल्या हिंसाचारानंतर शांतीस्थापनेकरीताही त्यांनी कार्य केले. सरदारांनी हिंदुस्थानातील ५६५ अर्धस्वायत्त संस्थानांचे भारतात विलीनीकरण करवून घेणे हे पटेलांचे सर्वात मोठे कार्य होय. मुत्सद्देगिरी व वेळ पडल्यास सैन्यबळ वापरून सरदारांनी संस्थाने भारतात विलीन केली आणि म्हणूनच ते भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जातात.

वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्ताने कंगणाने ट्विट केले, “सरदारवल्लभभाई पटेल यांना जयंती निमित्ताने शुभेच्छा, आपण आजचे अखंड भारत देणारे आपण आहात पण पंतप्रधान म्हणून आपल्या पदाचा त्याग करून आपण आपले महान नेतृत्व आणि दृष्टी आमच्यापासून दूर नेली. आपल्या निर्णयाबद्दल आम्ही दिलगीर आहोत.” कंगणाने ट्विट करून दिलगिरी व्यक्त केली आहे.

Exit mobile version